Sachin Vaze यांनी १६ फेब्रुवारीच्या रात्री फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आणली होती भली मोठी रक्कम

अँटेलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणात अटकेत असलेले सचिन वाझे यांच्याबाबत आता नवी माहिती समोर आली आहे. सचिन वाझे यांनी १६ फेब्रुवारीच्या रात्री भली मोठी रक्कम पंचतारांकित हॉटेलमध्ये आणली होती अशी माहिती आता NIA च्या सूत्रांनी दिली आहे. सचिन वाझे यांनी दक्षिण मुंबईत असलेल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं. त्यावेळी त्यांनी पाच मोठ्या […]

mumbaitak

mumbaitak

दिव्येश सिंह

• 01:40 AM • 26 Mar 2021

follow google news

अँटेलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणात अटकेत असलेले सचिन वाझे यांच्याबाबत आता नवी माहिती समोर आली आहे. सचिन वाझे यांनी १६ फेब्रुवारीच्या रात्री भली मोठी रक्कम पंचतारांकित हॉटेलमध्ये आणली होती अशी माहिती आता NIA च्या सूत्रांनी दिली आहे. सचिन वाझे यांनी दक्षिण मुंबईत असलेल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं. त्यावेळी त्यांनी पाच मोठ्या बॅगा सोबत आणल्या होत्या या बॅगांमध्ये भल्या मोठ्या प्रमाणावर रक्कम असल्याचं एनआयएच्या सूत्रांनी म्हटलं आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमधलं मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती लागलं आहे.

हे वाचलं का?

एनआयएच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. सचिन वाझेंच्या संदर्भात बुधवारीही एक माहिती समोर आली होती. ती माहिती अशी होती की ते मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये थांबले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्यासोबत एका महिलेचा वावर होता. या महिलेचाही शोध घेण्यात येतो आहे. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिच्या चेहऱ्यावर मास्क असल्याने तिची ओळख पटवणं कठीण जातं आहे.

सचिन वाझेंना या पाच बॅगांबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. १६ फेब्रुवारीला त्यांनी या पाच बॅगा हॉटेलमध्ये का आणल्या होत्या? दक्षिण मुंबईतल्या हॉटेलमधली एक रूम वाझेंच्या नावावर एका व्यापाऱ्याने का बुक केली होती? या व्यापाऱ्याने सचिन वाझेंना या रुमचं रेंट म्हणून १३ लाख रूपये दिले होते. एका ट्रॅव्हल एजंट मार्फत हे पैसे देण्यात आले होते. एनआयएच्या हाती जे सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे त्यामध्ये सचिन वाझे पाच काळ्या रंगांच्या बॅगांसहीत दिसतो आहे. या बॅगा स्कॅन झाल्या होत्या. ते स्कॅनिंगही एनआयएने तपासल्याचं कळतंय. तसंच यासंदर्भातल हॉटेलमधल्या काही लोकांनाही विचारण्यात आलं. यासंदर्भातल हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनाही विचारणा झाली तसंच सचिन वाझेंनीही अनेक प्रश्न विचारले गेले. स्कॅन ग्रॅब्समध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे दिसत आहेत त्याबद्दलही वाझेंना विचारण्यात आलं असंही एनआयएच्या सूत्रांनी म्हटलं आहे.

सचिन वाझे यांचं नाव अँटेलिया स्फोटक प्रकरणात समोर आलं. तसंच या प्रकरणी त्यांना १३ मार्चला अटकही करण्यात आली. त्यांच्या कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांना NIA कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी मला बळीचा बकरा बनवलं जातं आहे असं वक्तव्य केलं. तसंच मला अडकवण्यात येतं आहे असंही म्हटलं. मात्र एनआयने गुरूवारी कोर्टात गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे यांच्या घरी ६२ अशा बुलेट सापडल्या आहेत ज्यांची रितसर नोंद करण्यात आलेली नाही. तसंच सचिन वाझे यांनी मोठ्या प्रमाणावर डेटा डिलिट केला आहे. या बुलेट त्यांच्याकडे का होत्या? तसंच त्यांनी कोणता डेटा डिलिट केला याचीही माहिती घेण्यात येते आहे. आता या प्रकरणात आणखी काय वळणं लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp