16 जानेवारीला आपल्या राहत्या घरी झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा जबाब नोंदवला. सैफने पोलिसांना सांगितलं की, 16 जानेवारीच्या रात्री तो आणि त्याची पत्नी करीना कपूर 11 व्या मजल्यावर त्यांच्या बेडरूममध्ये होते. तेव्हाच त्यांना त्यांच्या नर्स एलियामा फिलिपच्या ओरडण्याचा आवाज आला. सैफने सांगितलं की त्याने हल्लेखोराला अडवलं आणि घट्ट पकडून ठेवलं. यावेळी हल्लेखोराने त्याच्या पाठीवर, मानेवर आणि इतर ठिकाणी अनेक वार केले.
ADVERTISEMENT
मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात सैफ अली खानने म्हटलं आहे की, जेव्हा त्यानं त्याची नर्स आलियामा फिलिपच्या ओरडण्याचा आवाज ऐकला तेव्हा, ते दोघेही जहांगीरच्या खोलीकडे धावले. तिथेच आलियामा फिलिप देखील झोपली होी. तिथे त्याला एक अनोळखी माणूस दिसला. जहांगीरही रडत होता. सैफने सांगितलं की, जेव्हा हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने वार केले, तेव्हा तो गंभीर जखमी झाला. त्यानं कशी तरी स्वतःची सुटका केली आणि नंतर हल्लेखोराला मागे ढकललं.
हे ही वाचा >> Mumbai Crime News : 20 वर्षीय महिलेवर अत्याचार, स्टेशनवर बेशुद्धावस्थेत आढळली महिला, नराधम रिक्षा चालक?
दरम्यान त्याच्या नर्सने जहांगीरलाही खोलीतून बाहेर काढलं आणि चोराला कोंडून ठेवलं. सैफने सांगितलं की, हा माणूस घरात घुसलेला पाहून सर्वांनाच धक्का बसला आणि भीती वाटली. हल्लेखोराने फिलिपवरही हल्ला केला.
सध्या अभिनेता सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि तो त्याच्या घरी आहे. घटनेनंतर, एका ऑटो चालकाने त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलं. तसंच त्याचा मित्र अफसर जैदीने रुग्णालयात उर्वरित प्रक्रिया पूर्ण केली. ऑफिसर झैदी हा सैफचा फॅमिली फ्रेंड आहे.
हे ही वाचा >> Eknath Shinde : "...तर आपल्या सर्वांची पाठ बाळासाहेबांनी थोपटली असती", उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले
अफसर झैदी यांनी सैफला रुग्णालयात नेलं नव्हतं, तर अफसर झैदी पहाटे 4 वाजता रुग्णालयात पोहोचले. सैफच्या कुटुंबानेच त्यांना रुग्णालयात पोहोचण्यास सांगितलं होतं. सैफच्या कुटुंबाच्या विनंतीनुसार अफसर झैदी हे माध्यमांशी बोलणार नाहीत असं त्यांनीच स्वत:सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
