‘तुमको खतम कर देंगे’; समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी, ट्विटरवरून कुणी केला मेसेज?

दिव्येश सिंह

• 05:48 AM • 19 Aug 2022

एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. या माहितीने खळबळ उडाली असून, समीर वानखेडेंनी याबद्दलची तक्रार मुंबई पोलिसांना दिली आहे. एका ट्विटर हॅण्डलवरून ही धमकी देण्यात आली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे वादात सापडलेले मुंबई एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. या माहितीने खळबळ उडाली असून, समीर वानखेडेंनी याबद्दलची तक्रार मुंबई पोलिसांना दिली आहे. एका ट्विटर हॅण्डलवरून ही धमकी देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे वादात सापडलेले मुंबई एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. समीर वानखेडे यांनी याबद्दलची माहिती स्थानिक पोलिसांना दिली आहे.

समीर वानखेडे यांना एका ट्विटर हॅण्डलवरून धमकी देण्यात आलीये. ज्या ट्विटर हॅण्डलवरून धमकी देण्यात आली आहे, ते १४ ऑगस्ट रोजी तयार करण्यात आलेलं आहे, असं वानखेडे यांनी मुंबई पोलिसांना सांगितलं आहे.

समीर वानखेडे यांचा जन्मदाखला, शाळा दाखल्यांतील माहितीत काय आहे तफावत?

समीर वानखेडेंना कुणी दिलीये धमकी?

एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांना ज्या ट्विटर अकाऊंटवरून धमकी देण्यात आलीये, ते अकाऊंट अमन नावाचं आहे. १४ ऑगस्ट रोजी हे अकाऊंट बनवलं गेलंय.

समीर वानखेडेंना काय धमकी देण्यात आलीये?

अमन नावाच्या ट्विटर हॅण्डलवरून समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. समीर वानखेडेंना पाठवण्यात आलेल्या मेसेजमध्ये म्हटलंय की, “तुला माहिती नाहीये की तू काय केलंय? तुला याचा हिशोब द्यावा लागेल. तुला संपवून टाकू. (तुमको पता नहीं तुमने क्या किया है, इसका हिसाब तुमको देना पडेगा. तुमको खतम कर देंगे.)”

मुंबई पोलिसांनी नोंदवला समीर वानखेडेंचा जबाब

सोशल मीडियावरून धमकी मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतली असून, त्याचबरोबर समीर वानखेडे यांचा जबाबही नोंदवला आहे. गोरेगाव पोलीस सध्या या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहे.

समीर वानखेडेंनी मुंबई पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ज्या ट्विटर अकाऊंटवरून धमकी देण्यात आलीये. त्याला एकही फॉलोअर नाहीये. त्यामुळे समीर वानखेडेंना धमकी देण्यासाठीच हे अकाऊंट तयार करण्यात आलं असावं, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.

आर्यन खान प्रकरणामुळे वादात सापडलेल्या समीर वानखेडेंची चेन्नईत ‘नॉन सेंसिटिव्ह’ पदावर बदली

जात प्रमाणपत्र प्रकरणात समीर वानखेडेंना क्लिन चीट

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीने करण्यात आलेल्या कारवायांवर शंका उपस्थित केल्या होत्या. समीर वानखेडे यांच्यावर आरोपही केले होते. त्याचबरोबर समीर वानखेडे यांच्यावर बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता.

जात प्रमाणपत्र प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपात समीर वानखेडेंना काही दिवसांपूर्वीच दिलासा मिळाला. जात पडताळणी समितीने समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम असल्याचा दावा फेटाळून लावत त्यांना क्लिन चीट दिलीये.

    follow whatsapp