Sameer Wankhede: मेहुणीच्या ड्रग प्रकरणाबाबत समीर वानखेडेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी सोमवार (11 नोव्हेंबर) एक ट्विट करुन पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या भूमिकेबाबत काही गंभीर सवाल उपस्थित केले होते. ज्याला आता स्वत: समीर वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे. समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिची बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर (Harshada Dinanath Redkar) ही ड्रग्जच्या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 06:51 AM • 08 Nov 2021

follow google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी सोमवार (11 नोव्हेंबर) एक ट्विट करुन पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या भूमिकेबाबत काही गंभीर सवाल उपस्थित केले होते. ज्याला आता स्वत: समीर वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिची बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर (Harshada Dinanath Redkar) ही ड्रग्जच्या व्यवसायात गुंतली आहे का? असा सवाल करणारं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे. एवढंच नव्हे तर या प्रकरणातील एक केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे याबाबत उत्तर द्या. असं म्हणत नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडेंवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेल्या या ट्विटनंतर आता समीर वानखेडे यांनी देखील नवाब मलिकांना उत्तर दिलं आहे. मलिकांनी केलेल्या ट्विटबद्दल जेव्हा वानखेडे यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, ‘जेव्हा 2008 साली हे प्रकरण घडलं तेव्हा मी सेवेत देखील नव्हतो. मी 2017 साली क्रांती रेडकरशी लग्न केलं आहे. म्हणजेच ड्रग्ज प्रकरणातील केसनंतर तब्बल नऊ वर्षांनी. त्यामुळे माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. ही घटना जुनी आहे मग तरीही माझा या खटल्याशी संबंध कसा?’ असा प्रति सवाल वानखेडे यांनी नवाब मलिक यांना केला आहे.

दुसरीकडे नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आलेल्या या आरोपांना अभिनेत्री क्रांती रेडकर उत्तर देणार आहेत. याबाबत त्या दुपारी 1 वाजेच्या सुमारास पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचं समजतं आहे. त्यावेळी त्या मलिक यांच्या आरोपाला उत्तर देण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp