Wel-come back Sanjay Raut! शायरी म्हणत नबाव मलिकांच्या मुलीने केले राऊतांचे स्वागत

मुंबई तक

• 04:47 PM • 09 Nov 2022

मुंबई : अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले. बुधवारी संध्याकाळी उच्च न्यायालयातही जामीनावर शिक्कामोर्तब होताच ते ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर आले. यानंतर त्यांनी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांना हात उंचावून अन् मशाल चिन्ह असलेलं शिवसेनेचं भगवं मफलर उंचावून अभिवादन केलं. यावेळी 102 दिवसांपूर्वी तुरुंगातून जाताना त्यांचा जो आक्रमक अंदाज होता तोच […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले. बुधवारी संध्याकाळी उच्च न्यायालयातही जामीनावर शिक्कामोर्तब होताच ते ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर आले. यानंतर त्यांनी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांना हात उंचावून अन् मशाल चिन्ह असलेलं शिवसेनेचं भगवं मफलर उंचावून अभिवादन केलं. यावेळी 102 दिवसांपूर्वी तुरुंगातून जाताना त्यांचा जो आक्रमक अंदाज होता तोच पुन्हा एकदा पाहायला मिळाला.

हे वाचलं का?

दरम्यान, संजय राऊत बाहेर येताच सध्या ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक यांच्या मुलीने शायरी म्हणतं संजय राऊत यांचं स्वागत केले. सना मलिक-शेख यांनी ट्विट करत म्हटलं की, यह होसला कैसे झुके! राह पे कांटे बिखरे अगर, उसपे तो फिर भी चलना ही है, शाम छुपाले सूरज मगर, रात को एक दिन ढलना ही है! Welcome Back, sanjay raut ji!

नवाब मलिक यांना देखील ईडीने अटक केली आहे. सध्या ते न्यायायलयीन कोठडीत असले तरीही ते जामीनासाठी प्रयत्न करत होते. मात्र त्यांना जामीन देण्यात आला नाही. अशात आता राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर सना मलिक यांनी शायरीतून भावना व्यक्त करत नवाब मलिकही लवकरच बाहेर येतील अशी आशा व्यक्त केली आहे.

आम्ही लढणारे आहोत, लढत राहू : तुरुंगाबाहेर येताच राऊतांची पहिली प्रतिक्रिया :

संजय राऊत यांनी यावेळी ‘मुंबई तक’शी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माझी अटक बेकायदेशीर होती, हे न्यायालयानं सांगितलं. न्यायालयानं सांगितलं म्हणजे खरचं असणार. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण शेवटी आम्ही लढणारे आहोत. लढत राहू, असा निर्धारही राऊत यांनी व्यक्त केला.

आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरही जाणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्याशीही बोलणं झालं. ते माझे सर्वोच्च नेते आहेत. माझे मित्र आहेत, भाऊ आहेत. माझा आवाज ऐकताचं त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्याही डोळ्यात अश्रू आले होते, अशी अत्यंत भावनिक प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

    follow whatsapp