सांगोला : खाजगी हॉस्पिटलमध्ये बिलासाठी अडवणूक; जखमी वारकऱ्यांच्या नातेवाईकांचा आरोप

मुंबई तक

• 07:28 AM • 01 Nov 2022

सांगोला : येथे सोमवारी सायंकाळी जुनोनी बायपासजवळ पंढरपूरला कार्तिकी यात्रेसाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत चारचाकी गाडी घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ७ वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर ७ जण जखमी झाले. या अपघातानंतर जखमींना उपचारासाठी सांगोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र यावेळी जखमींची खाजगी हॉस्पिटल आणि १०८ अॅम्बूलन्सने अडवणूक केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. काय म्हटलं […]

Mumbaitak
follow google news

सांगोला : येथे सोमवारी सायंकाळी जुनोनी बायपासजवळ पंढरपूरला कार्तिकी यात्रेसाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत चारचाकी गाडी घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ७ वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर ७ जण जखमी झाले. या अपघातानंतर जखमींना उपचारासाठी सांगोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र यावेळी जखमींची खाजगी हॉस्पिटल आणि १०८ अॅम्बूलन्सने अडवणूक केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं नातेवाईकांनी?

आम्ही तिथे जाण्यापूर्वीच सप्तगुरु हॉस्पिटलमध्ये जखमींना अॅडमिट केले होते. तिथं तपासण्या झाल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी सोलापूरला न्यूरो सर्जनला दाखविण्यास सांगितलं. त्यावेळी त्यांनी २ तासांच १९ हजार रुपये बिलं सांगितलं. औषध देखील २ हजार १५० रुपयांची दिली.

पंढरपूरला पायी निघालेल्या वारकऱ्यांवर काळाची झडप; दिंडीत घुसलेल्या कारने ७ जणांना चिरडलं

दुसऱ्या रुग्णांलाही जवळपास ११ हजार रुपयांच बिलं भरायला सांगितलं. त्याला १ हजार ७०० रुपयांची औषध दिली. असे जवळपास ४ हजार रुपये औषधाचे आणि ३१ हजार हॉस्पिटलचे भरण्यास सांगितलं. पण आम्ही घरातून निघताना गडबडीत पैसे आणले नव्हते. त्यामुळे पेशंट बघायचा की पैशांकडे बघायचं हा प्रश्न होता. आम्ही उद्या सकाळी येऊन पैसे भरुन जातो अशी विनंती करुनही ते ऐकण्यास तयार नव्हते. प्रांत वगैरे सगळे तिकडे होते.

सोलापूर : अपघातातील मृत वारकऱ्यांची ओळख पटली; कुटुंबियांना पाच लाख रुपयांची तातडीची मदत

अखेरीस शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी येऊन शब्द टाकला. यांच्या पैशांना आम्ही जबाबदार आहे, असं हॉस्पिटलच्या प्रशासनाला सांगितलं. त्यानंतर हॉस्पिटलने पेशंट सोडला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच आम्हाला गाडी करुन दिली आणि पुढील उपचारासाठी पाठवलं, असंही जखमींच्या नातेवाईकांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितलं.

१०८ रुग्णवाहिकेवरही आरोप :

यावेळी नातेवाईकांनी १०८ या सरकारी रुग्णवाहिकेवरही गंभीर आरोप केले. आम्ही विनंती केली तेव्हा सांगितलं तुम्ही सांगताय ते हॉस्पिटल खाजगी आहे. त्यामुळे खाजगी हॉस्पिटलमध्ये आम्ही सेवा देत नाही. पण त्याच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तेव्हा 108 रुग्णवाहिकावाले लगेच तयार झाले. २ मिनिटात गाडी आली, त्यामुळे तिथही आपली अडवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं.

    follow whatsapp