सातारा: ‘ओ शेsssठ.. तुम्ही नादच केलाय थेट’, शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्याच नेत्याचा जबरा डान्स

इम्तियाज मुजावर

• 12:29 PM • 23 Nov 2021

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना सातारा जिल्हा बँक निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभव स्विकारावा लागला. ज्यानंतर राष्ट्रवादी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचेच नेते वसंतराव मानकुमरे यांनी ‘ओ शेठ… तुम्ही नादच केला थेट’ या गाण्याच्या तालावर तुफान डान्स केला. तसंच गुलाल उधळून त्यांनी आनंद साजरा केला आहे. शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीचे […]

Mumbaitak
follow google news

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना सातारा जिल्हा बँक निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभव स्विकारावा लागला. ज्यानंतर राष्ट्रवादी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचेच नेते वसंतराव मानकुमरे यांनी ‘ओ शेठ… तुम्ही नादच केला थेट’ या गाण्याच्या तालावर तुफान डान्स केला. तसंच गुलाल उधळून त्यांनी आनंद साजरा केला आहे.

हे वाचलं का?

शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीचे वसंतराव मानकुमरे यांनी आपला आनंद अजिबात न लपवता थेट डीजे लावून त्यावरच डान्स सुरु केला. सातारा जिल्हा बँकेची निवडणूक जाही झाल्यापासून निकाल लागेपर्यंत राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी शशिकांत शिंदे यांच्या विरोधात सर्व फासे आवळले होते.

भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे यांना आपला पाठिंबा देत जावळी तालुक्यातील 25 सोसायटी मतदार संघाचे निवडणूक मतदान प्रतिनिधी यांना सहलीवर एक महिना फिरवले होते. कधी राजस्थान, कधी केरळ तर कधी गोवा अशा एक महिना पंचवीस मतदारांना सहलीवर घेऊन जाणारे राष्ट्रवादीचे वसंतराव मानकुमरे यांनी शशिकांत शिंदे यांना या निवडणुकीमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या ताकतीवर मोठा झटका दिला.

प्रत्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले या निवडणुकीमध्ये भलेही नामानिराळे असले व सत्ताधारी पक्षाबरोबर असले तरी ज्ञानदेव रांजणे यांच्या विजयामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सिंहाचा वाटा असल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्ष ज्ञानदेव रांजणे हे उमेदवार नसून या निवडणुकीत दस्तुरखुद्द पडद्यामागचे शिवेंद्रसिंहराजेचे उमेदवार असल्याची सध्या चर्चा सातारा जिल्ह्यामध्ये जोर धरू लागली होती.

म्हणूनच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे यांचा अवघ्या एका मताने विजय झाल्यानंतर राष्ट्रवादीचे वसंतराव मानकुमरे यांच्या वसंत गडावर राष्ट्रवादीच्याच जावळी तालुक्यातील या कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात व बँडबाजा लावून शशिकांत शिंदे यांच्या पराभवाचा आनंद लुटला.

अवघ्या एका मताने शशिकांत शिंदे यांचा पराभव

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत चारही राजे बिनविरोध निवडले गेल्याने आमदार शशिकांत शिंदे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, शंभुराजे देसाई, माणचे मनोज पोळ, खटावचे नंदकुमार मोरे, कोरेगावचे शिवाजीराव महाडिक, पाटणचे सत्यजितसिंह पाटणकर यांच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष होतं. निकाल समोर आले असून, शशिकांत शिंदे आणि शंभुराजे देसाई यांचा पराभव झाला आहे. तर बाळासाहेब पाटील यांचा विजय झाला आहे.

साताऱ्यात शशिकांत शिंदेंच्या समर्थकांचा राडा! दगडफेक, अजित पवारांविरोधात घोषणाबाजी

जावळी मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांच्याविरोधात ज्ञानेश्वर रांजणे यांनी अर्ज भरला होता. रांजणे यांची शेवटपर्यंत मनधरणी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून झाले. मात्र, त्यांनी माघार घेतली नाही. जावळी मतदारसंघातून 25 मतं घेत रांजणे यांनी शशिकांत शिंदेंना एका मताने पराभूत केलं आहे. एकूण मते 49 होती. त्यापैकी शिंदे यांना 24 मते मिळाली, तर रांजणे यांना 25 मते मिळाली.

    follow whatsapp