नागपूर : स्कॉर्पिओ पुलावर चढवली अन्…; चालकाच्या धाडसामुळे तीन जणांनी गमावला जीव

मुंबई तक

• 01:15 PM • 12 Jul 2022

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर सावनेर तालुक्यातील केळवद पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या नांदागोमुख छत्रापूर वरील ब्राम्हणमाळी पुलावरून स्कार्पीओटाकल्याने गाडीतील सहा जण वाहुन गेले. बचाव कार्यात आतापर्यत तीघांचे मृतदेह हाती लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसारसावनेर तालुक्यातील नांदा गोमुख येथे मुलीच्या वडिलांकडे पाहुणचारासाठी आलेल्या दातार मूलताई (मध्यप्रदेश) येथीलमुलाकडील आई, वडील, आत्या, बहीण व भाचा पाहुणपण आटोपून मूलताई (मध्यप्रदेश) येथे […]

Mumbaitak
follow google news

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

हे वाचलं का?

सावनेर तालुक्यातील केळवद पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या नांदागोमुख छत्रापूर वरील ब्राम्हणमाळी पुलावरून स्कार्पीओटाकल्याने गाडीतील सहा जण वाहुन गेले. बचाव कार्यात आतापर्यत तीघांचे मृतदेह हाती लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसारसावनेर तालुक्यातील नांदा गोमुख येथे मुलीच्या वडिलांकडे पाहुणचारासाठी आलेल्या दातार मूलताई (मध्यप्रदेश) येथीलमुलाकडील आई, वडील, आत्या, बहीण व भाचा पाहुणपण आटोपून मूलताई (मध्यप्रदेश) येथे जात असताना नांदा छत्रापूरमार्गावरील ब्राम्हणमाळी पुलावरून स्कॉर्पिओ गाडी चालकाने पुराच्या पाण्यात टाकली. पाण्याच्या प्रवाहात वाहून सहा जण वाहूनगेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

नांदा (गोमुख) येथील रहिवासी सुरेश ढोके यांच्या मुलीचे लग्न दातार (मध्यप्रदेश) येथील मधुकर पाटील यांच्या मुलासोबत जूनमहिन्यात झाले. मुलीच्या घरी घरगुती कार्यक्रम असल्याने मुलाचे वडील मधुकर पाटील, त्यांची पत्नी, मुलगी, बहीण व पुतण्यानांदा येथे आले. नांदा येथील पाहुणचाराचा कार्यक्रम आटोपून एमएच ३१, सीपी ०२९९ क्रमांकाच्या स्कार्पीओने जात असताना नांदायेथून जवळच असलेल्या ब्राम्हणमाळी पुलावरून पुराचे पाणी पुलावरून जात असताना सुद्धा गाडी चालकाने कुठलाही विचार नकरता पूल पार करण्याचा प्रयत्न केला. दुदैवाने गाडी पुलाच्या मधोमध बंद पडली. त्यावेळी त्यांनी बचावासाठी आरडाओरड केली.

पुलावरून पाणी वाहत असल्याने एक ट्रक पुलाजवळ होता. ट्रक चालकानं स्कॉर्पीओ पुलाच्यामध्ये बंद पडली हे पाहून त्याने दोरफेकला. मधुकर पाटील यांनी गाडीतून उतरून बंद पडलेल्या गाडीला दोर बांधला. परंतु पुलावरून पाणी वेगाने वाहत असल्याने दोरतुटल्याने मधुकर पाटील यांच्यासह गाडी पाण्याच्या प्रवाहात नदीत वाहून गेली. ही घटना ट्रकचालकाने गावात दूरध्वनीवरूनकळविली. लगेच घटनास्थळी नांदा गावातील नागरिक व केळवद पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले. स्कॉर्पीओ पुलापासून४०० मीटर अंतरावर रेतीच्या गाळात अडकली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडी बाहेर काढली. तेव्हा त्यात तीन मृतदेह होते. तर इतर तीन पुराच्या प्रवाहात वाहून गेले.

मृतकांमध्ये मधुकर पाटील (वय ६५), निर्मला मधुकर पाटील (वय ५५), निमू आठनेरे (वय ४५, रा.मूलताई), रोशनी नरेंद्र चौकीदार(वय ३२ रा. झिंगाबाई टाकळी, नागपूर), दर्श नरेंद्र चौकीदार (वय १०) व चालक लीलाधर डिवरे (३८ रा. झिंगाबाई टाकळी नागपूर) हे असून निमू आठनेरे, रोशनी चौकीदार व मधुकर पाटील यांचे मृतदेह सापडले असून लीलाधर डिवरे, दर्श चौकीदार व निर्मलापाटील बेपत्ता असून शोधकार्य सुरु आहे.

    follow whatsapp