शिवसेनेच्या लोकसभा खासदार आणि संजय राऊतांमध्ये मतभेद?; मातोश्रीवर बैठकीत काय झालं?

मुंबई: शिवसेनेच्या (Shivsena) खासदारांनी आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) येत्या दोन दिवसांत निर्णय घेतील, असे या बैठकीला उपस्थित असलेले खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते खासदारांच्या दबावाला […]

Mumbai Tak

मुस्तफा शेख

• 01:33 PM • 11 Jul 2022

follow google news

मुंबई: शिवसेनेच्या (Shivsena) खासदारांनी आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) येत्या दोन दिवसांत निर्णय घेतील, असे या बैठकीला उपस्थित असलेले खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते खासदारांच्या दबावाला बळी पडतील की विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या पाठिशी उभे राहतील हे पाहावं लागणार आहे.

हे वाचलं का?

या बैठकीत राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यशवंत सिन्हा यांचे समर्थन केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे संजय राऊत आणि इतर खासदारांमध्ये विरोधाभास प्रकर्षाने जाणवत होता. बैठकीनंतर संजय राऊत मीडियाशी न बोलता मातोश्रीवरून निघून गेले. दरम्यान, आजच्या बैठकीला 19 पैकी 12 लोकसभेतील शिवसेनेचे खासदार उपस्थित होते. श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी यांच्यासह सात खासदार बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

किर्तिकर म्हणाले की, त्यांच्या दोन खासदारांची प्रकृती ठीक नाही आणि काही जणांना मुंबईत येता आले नाही. “उपस्थित सर्व खासदारांनी उद्धवजींना आपला पाठिंबा दर्शवला आहे. मुर्मू या आदिवासी महिला उमेदवार असल्याने बहुतांश खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला. यापूर्वीही सेनेने प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांसारख्या विरोधी उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. पक्षप्रमुख पुढील काही दिवसात आपला निर्णय देतील.

यावेळी लोकसभा खासदार गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, विनायक राऊत, हेमंत गोडसे, धैर्यशील माने, राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, ओमराजे निंबाळकर, राजेंद्र गावित, राजन विचारे आदी उपस्थित होते. राज्यसभा खासदार संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदीही उपस्थित होते.

    follow whatsapp