ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रूग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांकडून प्रकृतीची विचारपूस

मुंबई तक

• 01:20 PM • 25 Nov 2021

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती बिघडल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यातील रूबी हॉल रूग्णालयात अण्णा हजारे यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अण्णा हजारे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. डॉ. परवेझ ग्रांट यांनी ही अँजिओग्राफी केली. […]

Mumbaitak
follow google news

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती बिघडल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यातील रूबी हॉल रूग्णालयात अण्णा हजारे यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

हे वाचलं का?

अण्णा हजारे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. डॉ. परवेझ ग्रांट यांनी ही अँजिओग्राफी केली. अँजिओप्लास्टी करण्याची आवश्यकता नाही असंही डॉक्टरांनी सांगितलं. तसंच आम्ही अण्णा हजारेंवर उपाय करत आहोत, त्यांची काळजी घेत आहोत चिंतेचं काही कारण नाही असंही डॉ. परवेझ यांनी स्पष्ट केलं.

अण्णा हजारे यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली तसेच लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री सद्या एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरू आहे. मात्र आज अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळल्यावर त्यांनी अण्णांच्या प्रकृतीला आराम मिळावा अशी भावना व्यक्त केली.

84 वर्षीय अण्णा हजारे हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. ग्रामीण विकासला चालना देण्याससोबतच सरकार आणि प्रशासनात पारदर्शकता कशी येईल याकडे त्यांनी कायमच लक्ष दिलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी या गावात त्यांचं वास्तव्य असतं. 1992 मध्ये अण्णा हजारे यांना पद्म भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरवही करण्यात आला आहे.

‘या’ कायद्यासाठी अण्णा हजारेंनी दिला आंदोलनाचा इशारा, ठाकरे सरकारलाही सुनावलं!

2011 मध्ये त्यांनी उभी केलेली लोकपालची लढाई देशाला अजूनही माहित आहे. भ्रष्टाचार विरोधी लोकपाल विधेयक लागू करण्यासाठी त्यांनी सत्याग्रह आणि उपोषण केलं होतं. 2010 च्या मसुद्यात सरकारने इतर कठोर नियमांचा समावेश केला. त्यामुळे लोकपालला व्यापक बळ मिळालं. पंतप्रधानही लोकपालच्या कक्षेत येऊ शकतात ही त्यावेळी अण्णा हजारे यांची प्रमुख मागणी होती जी मान्य करण्यात आली. या आंदोलनात अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांच्यासारखे दिग्गज सहभागी झाले होते. त्याआधी माहितीचा अधिकार हा कायदा आणण्यासाठी अण्णा हजारेंनी मोलाचा वाटा उचलला आहे.

    follow whatsapp