आघाडीचं सरकार स्थापनेवेळी नरेंद्र मोदींशी काय चर्चा झाली होती?; शरद पवार म्हणतात…

मुंबई तक

• 06:30 AM • 11 Sep 2021

महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर नव्या आघाडीची चर्चा सुरू होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची चर्चा सुरू असतानाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेचं अधिवेशन सुरू असताना भेट घेतली. या भेटीबद्दल शरद पवार यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत उलगडा केला. इंडिया टुडे ग्रुपचं मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या ‘मुंबई तक’च्या […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर नव्या आघाडीची चर्चा सुरू होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची चर्चा सुरू असतानाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेचं अधिवेशन सुरू असताना भेट घेतली. या भेटीबद्दल शरद पवार यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत उलगडा केला.

हे वाचलं का?

इंडिया टुडे ग्रुपचं मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या ‘मुंबई तक’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विशेष मुलाखत दिली. ‘इंडिया टुडे’चे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई आणि कार्यकारी संपादक साहिल जोशी यांनी शरद पवार यांच्याशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी पाहून मला धक्काच बसला होता-शरद पवार

यावेळी राजदीप सरदेसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही आघाड्यांवर चर्चा करत असल्याची चर्चा होती. त्यावेळी आपण मोदींची भेट घेतली होती. नरेंद्र मोदींशी नेमकी काय चर्चा झाली होती?, असा प्रश्न विचारला.

या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीचा घटनाक्रम उलगडून सांगितला. शरद पवार म्हणाले, ‘मोदींसोबत अशी झाली… त्यावेळी मोदीजी नाहीत, पण त्यांच्याजवळच्या लोकांनी आम्ही (भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस) एकत्र सरकार बनवण्याची सूचना केली होती. आमच्याही काही नेत्यांचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. आमच्या संसदेतील नेत्यांची त्यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यातून त्यांना असं वाटत होतं की हे सरकार बनवणं शक्य आहे.’

‘सरकार बनवणं शक्य असल्याचं त्यांना सांगण्यात आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आमच्याही काहीजणांनी त्यांना हे सांगितलं असल्याचं असावं. हे काही बरोबर नाही आणि या पातळीवर गैरसमज होऊ नये म्हणून संसदेचं अधिवेशन चालू असतानाच मी उठून त्यांची भेट घेतली. त्यांना संसदेतच भेटलो.’

‘Modi सरकारने EDचा कितीही गैरवापर केला तरीही महाराष्ट्रातलं सरकार भक्कम’

‘मोदींना मी सांगितलं की, तुमचं आमचं हे सरकार बनवणे, एकत्र येणं शक्य होणार नाही. आपला वैयक्तिक सलोखा कायम राहिल, यात काही वाद नाही. राष्ट्रीय प्रश्न जेव्हा येतील, तेव्हा आम्ही राष्ट्रहिताच्या बाजूनं असू’, पण आम्ही तुमच्याबरोबर सरकार बनवू शकत नाही, असं सांगितलं आणि उठून आलो’, असा घटनाक्रम शरद पवारांनी उलगडून सांगितलं.

    follow whatsapp