Nagaland येथील स्वयंसेवकाचा किस्सा सांगत शरद पवारांनी केलं RSS चं कौतुक!

मुंबई तक

• 11:42 AM • 11 Sep 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई तक या वेब पोर्टल आणि युट्यूब चॅनलला प्रदीर्घ मुलाखत दिली आहे. आपल्या प्रदीर्घ मुलाखतीत विविध विषयांवर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. इंडिया टुडे ग्रुपचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई आणि इंडिया टुडेचे सिनीयर एक्झुकिटिव्ह एड़िटर साहिल जोशी यांनी शरद पवार यांना प्रश्न विचारले. या प्रश्नांना त्यांनी मनमोकळी उत्तरं […]

Mumbaitak
follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई तक या वेब पोर्टल आणि युट्यूब चॅनलला प्रदीर्घ मुलाखत दिली आहे. आपल्या प्रदीर्घ मुलाखतीत विविध विषयांवर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. इंडिया टुडे ग्रुपचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई आणि इंडिया टुडेचे सिनीयर एक्झुकिटिव्ह एड़िटर साहिल जोशी यांनी शरद पवार यांना प्रश्न विचारले. या प्रश्नांना त्यांनी मनमोकळी उत्तरं दिली आहेत. हिंदुत्ववादी शक्ती कधी काळी मेनस्ट्रीममध्ये नव्हत्या. पण आता सलग दोनवेळा सत्ते आल्यानंतर राजकारणात काय बदल झाला आहे? असा प्रश्न राजदीप सरदेसाई यांनी विचारला त्यावेळी शरद पवारांनी संघाचं कौतुक केलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाले शरद पवार?

प्रागतिक विचारांच्या शक्ती या तुलनात्मकदृष्ट्या दुबळ्या झाल्या. याचा फायदा कोण घेऊ शकतं? अतिरेकी भूमिका घेऊन जनमानसात विचारधारा मांडण्याचा प्रयत्न करणारे काही कमिटेड लोक असतात. त्यांना त्यामध्ये यश मिळतं. असं असलं तरीही एक गोष्ट मान्य केली पाहिजे आज भाजपकडे एक संघटन (RSS) आहे. आजचा भाजप बऱ्याच बाबतीत काँग्रेसच्या जवळ जातो आहे. मात्र कमिटेड लोक त्या संघटनेत आहेत. मी नागालँडमधे होतो. विमानतळावर मला एक गृहस्थ दिसले. त्यांच नाव सांगत नाही पण तो चेहरा मला परिचित होता. मी त्यांना विचारलं इथे काय करतो? तर त्याने मला उत्तर दिलं ‘संघाने मला इथे 20 वर्षे काम करायला सांगितलं आहे. कॉलेज सोडल्यावर तू इथेच आहे का? तर तो हो म्हणाला.

तुझं घरदार कोण चालवतं? संघाकडून मिळालेले दोनशे रूपये घरी जातात. माझी इथली व्यवस्था संघाचे लोक करतात.

लक्षात घ्या. 29 वर्ष नागालँडसारख्या ठिकाणी राहणं. जी काही विचारधारा असेल. मला आवडत नसेल. पण त्यांना आवडत असेल, तर त्याच्यासाठी एवढा त्याग, समर्पणाची तयारी असलेला संच असेल तर ही भाजपची जमेची बाजू आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

‘महाविकास आघाडी सरकार’पेक्षा ‘पुलोद’चं सरकार चालवणं अधिक सोप्प होतं, कारण… -शरद पवार

पुलोद सरकारबाबत काय म्हणाले शरद पवार?

यावेळी ‘पुलोद’चं सरकार व आता महाविकास आघाडीचं सरकार यात काय फरक जाणवतो? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले, ‘यात फार फरक आहे. कारण या सरकारमधील दोन्ही काँग्रेसने आधी दहा वर्ष एकत्र सरकार चालवलं आहे. आम्ही एकाच विचारधारेचे लोक आहोत. आमचा विचार गांधी-नेहरूंचा, फक्त कार्यपद्धतीबद्दल मतभेद होते. त्यामुळे त्यात वेगळेपण नव्हतं’, असं पवार यांनी सांगितलं.

‘यावेळी (महाविकास आघाडीचा प्रयोग) शिवसेना सोबत आली. शिवसेना सुरूवातीपासूनच काँग्रेसच्या इतक्या विरोधात नव्हती. आणीबाणीच्या काळात बाळासाहेबांनी स्वच्छपणे पाठिंबा दिला होता. त्यानंतर जी निवडणूक झाली. त्या निवडणुकीत महाराष्ट्रात अंतुले मुख्यमंत्री झाले. त्या निवडणुकीत शिवसेनेनं अशी भूमिका घेतली होती की, काँग्रेसविरुद्ध उमेदवार दिलेला नव्हता. आज महाराष्ट्रात आम्ही एकत्र आलोय, पण यापूर्वीही शिवसेनेनं अशी भूमिका घेतलेली होती. त्याच मुख्य कारण कदाचित अति डाव्याच्या विरोधात असल्यामुळे ते झालं असावं’, असं पवारांनी सांगितलं.

    follow whatsapp