उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती; फडणवीसांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर

मुंबई तक

• 11:56 AM • 16 Oct 2021

दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर भाजपनं जोरदार टीकास्त्र डागलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा होती, असा थेट आरोप केला. फडणवीसांच्या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं. शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडीची स्थापना आणि मुख्यमंत्री पदाच्या नावाच्या निवडीचा […]

Mumbaitak
follow google news

दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर भाजपनं जोरदार टीकास्त्र डागलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा होती, असा थेट आरोप केला. फडणवीसांच्या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं.

हे वाचलं का?

शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडीची स्थापना आणि मुख्यमंत्री पदाच्या नावाच्या निवडीचा किस्सा शरद पवारांनी सांगितला. पवार म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी सांगितलं की, काहीही करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. मी जबाबदारीने सांगतोय. हे जे आघाडीचं सरकार झालं, ते बनवण्यात आमच्या काही सहकाऱ्यांचा हात होता. त्यात माझाही किंचित होता. माझाही किंचित सहभाग होता’, असं पवार म्हणाले.

केंद्रीय अधिकारी सांगत होते काम संपलं, पण त्यांना थांबायला सांगितलं जात होतं -शरद पवार

‘ज्यावेळी सगळ्या आमदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत सरकारचं नेतृत्व कुणी करायचं, याबद्दल आमच्याकडे दोन-तीन नावं आमच्याकडे आलेली होती. उद्धव ठाकरे ती बाब मान्य करायला तयार नव्हते. ते माझ्या बाजूला बसले होते. उद्धव ठाकरेंचा हात धरला आणि वर केला आणि सांगितलं हेच होतील. त्यावेळी त्यांची हात वर करायची तयारी नव्हती. त्यांची मुख्यमंत्री व्हायचीही तयारी नव्हती. त्यांना सक्तीने मी हात वर करायला लावला. नंतर त्यांनी सांगितलं आणि ती गोष्ट सत्य आहे’, असं म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाला उत्तर दिलं.

‘त्यांचा हात वर उचलत मी म्हटलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की, असे आरोप करू नका. हे योग्य नाही. स्वतः फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बरंच काही माहिती आहे’, असंही पवार म्हणाले.

उद्धवजी राणे, राज ठाकरेंना शिवसेनेतून का बाहेर जावं लागलं?, फडणवीसांचा तिखट सवाल

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले होते की, ‘मला असं वाटतं की, आता तरी उद्धवजींनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे आणि हे मान्य केलं पाहिजे की, मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती; ती त्यांनी पूर्ण केली. राजकारणात महत्त्वाकांक्षा असणं हे चुकीचं नाहीये. पण ती लपवून त्याच्या पाठीमागे तत्वज्ञान उभं करणं हे मात्र चुकीचं आहे’, असं फडणवीस म्हणाले होते.

    follow whatsapp