ED च्या आरोपपत्रात शरद पवारांचं नाव, पत्रा चाळ घोटाळा नेमका आहे तरी काय?

मुंबई तक

20 Sep 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:46 AM)

पत्रा चाळ प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे ते म्हणजे ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटमुळे. या चार्जशीटमध्ये शरद पवारांच्या नावाचा उल्लेख आहे. तसंच माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचाही उल्लेख आहे. या दोघांसोबत संजय राऊत यांच्या बैठका झाल्या. त्यानंतर वाधवानची एंट्री या सगळ्या प्रकरणात झाली असं ईडीने त्यांच्या आरोपपत्रात म्हटलं आहे. त्यावरून चांगलंच राजकारणही रंगलं आहे. […]

Mumbaitak
follow google news

पत्रा चाळ प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे ते म्हणजे ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटमुळे. या चार्जशीटमध्ये शरद पवारांच्या नावाचा उल्लेख आहे. तसंच माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचाही उल्लेख आहे. या दोघांसोबत संजय राऊत यांच्या बैठका झाल्या. त्यानंतर वाधवानची एंट्री या सगळ्या प्रकरणात झाली असं ईडीने त्यांच्या आरोपपत्रात म्हटलं आहे. त्यावरून चांगलंच राजकारणही रंगलं आहे. अशात आता हे पत्रा चाळ प्रकरण नेमकं काय आहे आपण जाणून घेणार आहोत.

हे वाचलं का?

काय आहे पत्रा चाळ प्रकरण?

गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने म्हाडासोबत गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी करार केला होता. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनला याठिकाणी ३ हजाराहून अधिक फ्लॅट तयार करायचे होते. एकूण फ्लॅटपैकी ६७२ फ्लॅट हे पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि गुरुआशिषकडे राहणार होते.

दरम्यान, गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने कोणतंही बांधकाम न करता म्हाडा आणि पत्रा चाळीतील रहिवाशांची फसवणूक केली. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने ही जमीन १०३४ कोटी रुपयांना दुसऱ्या बिल्डरला विकली होती.

प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय

या प्रकरणात ईडीने अटक केलेले प्रवीण राऊत हे पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या एचडीआयएलचे सारंग आणि राकेश वाधवान यांच्यासह फर्मचे संचालक होते. मार्च २०१८ मध्ये म्हाडाने गुरुआशिष बांधकामांविरोधात एफआयआर दाखल केला. फेब्रुवारी २०२० मध्ये प्रवीण राऊत यांना EOW ने अटक केली होती तर सारंग वाधवन अटकेत होता. मार्च २०१८ मध्ये म्हाडाने गुरुआशिष बांधकामांविरोधात एफआयआर दाखल केला. फेब्रुवारी 2020 मध्ये प्रवीण राऊतला EOW ने अटक केली होती तर सारंग वाधवानला EOW ने त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये EOW ने अटक केली होती. त्यानंतर राऊत यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

ईडीने या प्रकरणी ईसीआयआर नोंदवला आणि 1 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत आणि त्यांचे सहकारी सुजित पाटकर यांच्या निवासस्थानांसह सुमारे सात ठिकाणी झडती घेतली. प्रवीण राऊत यांना 2 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती, तर पाटकरांचा जबाब ईडीने नोंदवला होता. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मित्र असून पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असताना त्यांचे नावही समोर आले होते. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे समोर आले होते, ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट खरेदीसाठी केला होता. त्यानंतर ईडीने वर्षा आणि माधुरी राऊत यांचे जबाब नोंदवले गेले होते.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१० मध्ये प्रवीण राऊत यांना त्याच्या बँक खात्यात इक्विटी आणि जमीन व्यवहाराच्या नावाखाली ९५ कोटी रुपये मिळाले होते तरीही कंपनी प्रकल्प पूर्ण करू शकली नाही आणि कोणतेही उत्पन्न मिळाले नाही.

    follow whatsapp