Shardiya Navratri 2022 Date : नवरात्रोत्सव कधी? घटस्थापना कशी करायची, साहित्य काय हवं?

मुंबई तक

• 09:14 AM • 12 Sep 2022

वाजत गाजत विराजमान झालेल्या लाडका बाप्पाने म्हणजे विघ्नहर्ता गणरायाने अनंत चतुर्थीला निरोप घेतला. त्यानंतर वेध लागले आहेत ते शारदीय नवरात्री उत्सवाचे! हिंदू धर्मात नवरात्रोत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. नऊ दिवस जल्लोष आणि देवीच्या भक्तीनं वातावरण भारावून गेलेलं असतं. तर जाणून घेऊयात यंदा शारदीय नवरात्रोत्सव आणि घटस्थापना नक्की कधी आहे याबद्दल… हिंदू धर्मात नवरात्रोत्सव महत्वाचा मानला जातो. […]

Mumbaitak
follow google news

वाजत गाजत विराजमान झालेल्या लाडका बाप्पाने म्हणजे विघ्नहर्ता गणरायाने अनंत चतुर्थीला निरोप घेतला. त्यानंतर वेध लागले आहेत ते शारदीय नवरात्री उत्सवाचे! हिंदू धर्मात नवरात्रोत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. नऊ दिवस जल्लोष आणि देवीच्या भक्तीनं वातावरण भारावून गेलेलं असतं. तर जाणून घेऊयात यंदा शारदीय नवरात्रोत्सव आणि घटस्थापना नक्की कधी आहे याबद्दल…

हे वाचलं का?

हिंदू धर्मात नवरात्रोत्सव महत्वाचा मानला जातो. तसं बघितलं तर वर्षात चार नवरात्री उत्सव येतात, पण चैत्र आणि शारदीय नवरात्रोत्सव विशेष मनाला जातो.

शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होते, ती नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेनं! मडक्यामध्ये धान्य पेरलं जातं. त्यावर अखंड नंदादीप लावला जातो. दररोज वेगवेगळ्या माळा लावल्या जातात, सकाळ-संध्याकाळ आरती, सार्वजनिक उत्सवातही, हे सारं केलं जातं. नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना केली जाते, त्याला घटस्थापनाही म्हटलं जातं.

घटस्थापना तारीख, विधी आणि पूजेची वेळ

यावर्षी आश्विन नवरात्री सोमवार म्हणजे 26 सप्टेंबर 2022 रोजी घटस्थापना होईल.

प्रतिपदा तिथी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 3 वाजून 23 मिनिटांनी सुरू होईल आणि 27 सप्टेंबर रोजी सकाळी 3 वाजून 8 मिनिटांनी संपेल.

शारदीय नवरात्र घटस्थापना मुहूर्त २०२२

शारदीय घटस्थापना मुहूर्त 26 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजून 28 मिनिटांपासून सुरू होईल आणि 8 वाजून 1 मिनिटाला संपेल. म्हणजे घटस्थापना करण्यासाठी1 तास आणि 33 मिनिटांचा वेळ असेल.

घटस्थापना अभिजित मुहूर्त

26 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजून 6 मिनिटांनी सुरू होईल आणि 12 वाजून 54 मिनिटांपर्यंत असेल. म्हणजे 48 मिनिटांचा वेळ असेल.

कन्या लग्न प्रारंभ

26 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजून 28 मिनिटांनी सुरू होईल आणि 26 सप्टेंबर रोजीच 8 वाजून 1 मिनिटाला संपेल.

शारदीय नवरात्रीला जुळून येणारे शुभ योग

विजय मुहूर्त – रात्री 2 वाजून 30 मिनिटांपासून ते 3 वाजून 18 मिनिटांपर्यंत.

घटस्थापना निशिता मुहूर्त- 27 सप्टेंबर रोजी सकाळी 12 वाजून 6 मिनिटांपासून ते सकाळी 12 वाजून 54 मिनिटांपर्यंत.

शारदीय नवरात्र घटस्थापना पूजा विधी

घटस्थापना नवरात्रीतील महत्त्वाचा विधी असतो. घटस्थापना नऊ दिवसांच्या उत्सवाचं प्रतिक असतो. एका ठराविक वेळेत घटस्थापना करण्यासाठी हिंदू धर्मात काही संकेत ठरवून दिलेले आहेत. त्यामुळे योग्य वेळी घटस्थापना करणं महत्त्वाचं मानलं जातं. अमावस्या आणि रात्रीच्या वेळी घटस्थापना करू नये असे संकेत आहेत.

घटस्थापना पूजा साहित्य

सात प्रकारची धान्य टाकण्यासाठी मातीचं एक भांड हवं. त्याचबरोबर सात प्रकारची धान्य टाकण्यासाठी चांगली माती घ्यावी. पाण्याने तांब्या भरून घ्यावा. सुपारी आणि कलशामध्ये ठेवण्यासाठी एक नाणं हवं. आंब्याच्या झाडाची पाच पानं घ्यावीत. अक्षदा आणि न सोललेला एक नारळ. नारळाला बांधण्यासाठी लाल कपडा, झेंडूची फुलं आणि दुर्वा हव्या.

घटस्थापना विधी

दुर्गा देवीची पूजा करण्यापूर्वी कलश तयार करावा. धान्य पेरण्यासाठी मोठ्या मातीचं भांड घ्यावं. त्यात माती टाका. सात प्रकारची धान्य टाका. नंतर पुन्हा माती आणि धान्य टाका आणि वरून परत माती टाका. वरून थोडं पाणी टाका. कलशामध्ये पाणी भरून घ्या. पाण्यात सुपारी, अत्तर, दुर्वा, अक्षदा आणि नाणी टाका (पैशाची नाणी). आंब्याची पाच पानं कलशावर ठेवा आणि वरून लाल कपड्यात बांधलेलं नारळ ठेवा. त्यानंतर देवीची पूजा करा आणि हा कलश देवीच्या समोर ठेवून द्या. दिवा लावा नंतर फळं ठेवा आणि देवीची आरती करा.

    follow whatsapp