Aditya ठाकरेंबाबत ‘ते’ विधान, संतापलेल्या शिवसैनिकांनी तानाजी सावंतांविरोधात..

मिथिलेश गुप्ता

11 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:04 AM)

Shivsainik Protest against Tanaji Sawant डोंबिवली: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंबाबत (Aaditya Thackeray) राज्याचे आरोग्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv sena) पक्षाचे नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी जहरी टीका केल्याने शिवसैनिक मात्र चांगलेच संतापले आहेत. ‘आदित्य ठाकरेंनी मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’ या त्यांच्या वक्तव्याविरोधात शिवसैनिकांनी जोडे […]

Mumbaitak
follow google news

Shivsainik Protest against Tanaji Sawant डोंबिवली: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंबाबत (Aaditya Thackeray) राज्याचे आरोग्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv sena) पक्षाचे नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी जहरी टीका केल्याने शिवसैनिक मात्र चांगलेच संतापले आहेत. ‘आदित्य ठाकरेंनी मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’ या त्यांच्या वक्तव्याविरोधात शिवसैनिकांनी जोडे मारो आंदोलन केलं आहे. (shiv sainiks strongly protested against tanaji sawant for making a controversial statement about aditya thackeray)

हे वाचलं का?

डोंबिवली पश्चिमेतील शिवसेना (UBT) पक्षातर्फे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. डोंबिवली विधानसभा संघटक प्रकाश तेलगोटे, संजय पाटील, रोहित म्हात्रे, किरण मोंडकर, शाम चौगुले आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वीच आमदार आदित्य ठाकरें यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वरळीतून निवडणूक लढविण्याचं आव्हान दिलं होतं. आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानाबाबत जेव्हा पत्रकारांनी मंत्री तानाजी सावंत यांना सवाल विचारला तेव्हा त्यांनी ‘आदित्य ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करू’, असं म्हणत तानाजी सावंत यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्याच निषेधार्थ आज डोंबिवलीत जोडे मारो आंदोलन करण्यात आलं.

Tanaji Sawant: ‘Aaditya ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये..’, सावंतांची बोचरी टीका

नेमकं काय म्हणालेले मंत्री तानाजी सावंत?

मंत्री तानाजी सावंत यांना सवाल विचारला तेव्हा त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘सध्या माझ्याकडे आरोग्य खाते आहे. माझ्याकडे सध्या चारच मेंटल हॉस्पिटल्स आहेत. या ठिकाणी कुठे जागा शिल्लक असेल तर त्याठिकाणी त्यांची नक्कीच नियुक्ती केली जाईल. ज्यांच्या मेंदूवर परिणाम झालेला असेल, त्यांना ताबडतोब वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करावे, असा सल्ला मी आमच्या मुख्यमंत्र्यांना देणार आहे. अशा पद्धतीने आपण आदित्य ठाकरेंना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करू.’ अशी टीका तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

महाराष्ट्रातील ‘या’ मतांवर भाजपचा डोळा? विनोद तावडेंनी सांगितलं गणित

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (UBT) आणि बाळासाहेबांची शिवसेना हे वारंवार आमनेसामने येत आहेत. त्यातूनच दोन्हीकडील नेते एकमेकांवर जहरी टीकाही करत आहेत. ज्यामुळे सातत्याने राजकीय वातावरण तापत आहे.

    follow whatsapp