ठाकरे गटातच ‘वॉर’! शहरप्रमुख रंजना पौळकरांवर प्राणघातक हल्ला, जिल्हाप्रमुखाला अटक

मुंबई तक

30 Nov 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:02 AM)

-जका खान, वाशिम राज्यभरात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यात राजकीय संघर्षाच्या ठिणग्या उडताना दिसत आहेत. वाशिममध्ये मात्र, ठाकरे गटातल्या नेत्यांमधील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आलाय. ठाकरे गटाच्या वाशिम शहरप्रमुख रंजना पौळकर यांच्यावर 10 नोव्हेंबर रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्याप्रकरणी आता ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनाच अटक करण्यात आलीये. वाशिममध्ये ठाकरेंची शिवसेनेसमोर वेगळीच […]

Mumbaitak
follow google news

-जका खान, वाशिम

हे वाचलं का?

राज्यभरात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यात राजकीय संघर्षाच्या ठिणग्या उडताना दिसत आहेत. वाशिममध्ये मात्र, ठाकरे गटातल्या नेत्यांमधील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आलाय. ठाकरे गटाच्या वाशिम शहरप्रमुख रंजना पौळकर यांच्यावर 10 नोव्हेंबर रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्याप्रकरणी आता ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनाच अटक करण्यात आलीये.

वाशिममध्ये ठाकरेंची शिवसेनेसमोर वेगळीच आव्हान उभी झाली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रंजना पौळकर यांची अलिकडेच वाशिम शहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. याच रंजना पौळकर यांच्यावर 10 नोव्हेंबर 2022 रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला.

रंजना पौळकर हल्ला : सुरेश मापारी यांच्यासह 6 जणांना अटक

ठाकरे गटाच्या शहरप्रमुख रंजना पौळकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद बांधकाम सभापती सुरेश मापारी यांच्यासह इतर 5 आरोपींना अटक करण्यात आलीये. सुरेश मापारी यांना अटक झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर चाकू हल्ला करणारा मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

शिवसेना कुणाची? दावा पक्का करण्यासाठी शिंदे-ठाकरेंना आयोगाकडून शेवटची संधी; 12 डिसेंबरला सुनावणी

रंजना पौळकर हल्लाप्रकरणी अगोदर नितीन कावरखे, भगवान वाकुडकर, अब्दुल जुबेर,अब्दुल वाजीद उर्फ गोऱ्या या चार आरोपींना अटक करण्यात आली होती, तर आज सुरेश मापारी व शेख नूर या दोघांना अटक झाल्यानं एकूण आरोपी 6 झाले आहेत. मंगळवारी (29 नोव्हेंबर) रात्री ११ वाजेच्या दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी पुजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

रंजना पौळकर यांच्या छाती आणि पोटावर वार

नव्यानेच नियुक्ती करण्यात आलेल्या महिला शहरप्रमुख रंजना पौळकर यांच्यावर 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान भरदिवसा ग्रामीण पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर चाकू हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात रंजना पौळकर गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर, वाशिमच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या पोटात व छातीत चाकू हल्ल्याने गंभीर दुखापत झालेली आहे. चाकू हल्ल्यात त्यांनी विरोध केल्यानं हाताच्या नसाही कापल्या गेल्या आहेत.

रंजना पौळकर यांनी जिवाला धोका असल्याची आधीच दिली होती तक्रार

रंजना पौळकर यांनी हल्ल्या होण्यापूर्वीच 26 सप्टेंबरला वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये जिवाला धोका असल्याची तक्रार दिली होती. शहर पोलिसांकडून अदखल पात्र तक्रार नोंदवण्यात आली होती. त्या तक्रारीचा व आता झालेल्या हल्ल्याचा काही सबंध आहे का याचाही पोलीस तपास करीत आहेत.

    follow whatsapp