Vinayak Raut : तुमचं मंत्रिपद काढून घेऊ; PM मोदींनी राणेंना दिला होता इशारा

मुंबई तक

03 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:27 AM)

(Shivsena mp vinayak raut allegations on central minister narayan rane) कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे असलेल्या पीएने या मंत्रालयाच्या माध्यमातून अनेकांना गंडे घातले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांनी राणेंना समज दिली होती. “त्या पीएला आधी हाकला, अन्यथा तुमचं मंत्रीपद काढून घेऊ” असा इशारा दिला असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना (उद्धव […]

Mumbaitak
follow google news

(Shivsena mp vinayak raut allegations on central minister narayan rane)

हे वाचलं का?

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे असलेल्या पीएने या मंत्रालयाच्या माध्यमातून अनेकांना गंडे घातले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांनी राणेंना समज दिली होती. “त्या पीएला आधी हाकला, अन्यथा तुमचं मंत्रीपद काढून घेऊ” असा इशारा दिला असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी केला.

कणकवलीत नवनिर्वाचीत सरपंचांच्या सत्कार कार्यक्रमात विनायक राऊत बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले, मागच्या अधिवेशनामध्ये नारायण राणे यांनी केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर दिले होते. या प्रकारानंतर राणे लोकसभेची पायरी चढायचे विसरले आहेत. अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासालाही उपस्थित राहत नाहीत, असाही टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊतांच्या या गौप्यस्फोटाची खिल्ली उडवली आहे. राऊत खासदार आहेत की नारायण राणेंच्या ऑफिसमधील चहा देणारा ऑफीस बॉय आहे हे त्यांनी आधी जाहीर करावं. नारायण राणेंचे नरेंद्र मोदी यांच्याशी कसे संबंध आहेत याची चिंता त्यांनी करू नये. पहिल्यांदा आपले संबंध उद्धव ठाकरे चांगले ठेवा, असा टोला त्यांनी लगावला.

तसंच विनायक राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी कधी, केव्हा आणि कसे प्रयत्न करत आहेत हे मी काय सांगितलं तर त्यांचे उरलेले कपडेही राहणार नाहीत. त्यामुळे विनायक राऊत यांनी नरेंद्र मोदी, नारायण राणे ही मोठी नावं घेवू नये, असा सल्लाही नितेश राणेंनी दिला.

नितेश राणेंनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या विरोधात कडेलोट आंदोलन छेडले आहे. आज पवारांच्या पुतळ्याचा विजयदुर्ग किल्ल्यावरून कडेलोट करत हे आंदोलन करण्यात आलं. यानंतर नितेश राणेंनी माध्यमांशी बोलताना आपली आक्रमक प्रतिक्रिया दिली.

    follow whatsapp