कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीतून कृष्णराज महाडिक यांची माघार! कारणही सांगितलं

Kolhapur Mahapalika Election 2026 : कृष्णराज धनंजय महाडिक यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतल्याची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाच्या निर्णयाचा आदर राखत आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Kolhapur Mahapalika Election 2026

Kolhapur Mahapalika Election 2026

मुंबई तक

28 Dec 2025 (अपडेटेड: 28 Dec 2025, 01:16 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीतून कृष्णराज महाडिक यांची माघार! कारणही सांगितलं

point

मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता, पक्षपातळीवर झालेल्या निर्णयानुसार माघार, कृष्णराज यांचं भाष्य

Kolhapur Mahapalika Election 2026 :  कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधून खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, आज (दि.28) कृष्णराज महाडिकांनी हा अर्ज माघारी घेतलाय. कृष्णराज धनंजय महाडिक यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतल्याची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाच्या निर्णयाचा आदर राखत आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हे वाचलं का?

राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र असलेले कृष्णराज महाडिक यांनी आपल्या निर्णयाबाबत सविस्तर भूमिका मांडताना आपण पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचे ठामपणे सांगितले. भारतीय जनता पक्ष ही शिस्तबद्ध संघटना असून, पक्षाच्या आदेशाचे पालन करणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयानुसार आणि वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेचा सन्मान राखत आपण महानगरपालिकेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेची निवडणूक महायुती एकत्रितपणे लढवणार असून, इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत इतर कार्यकर्त्यांना संधी मिळावी, या व्यापक विचारातून आपण माघार घेत असल्याचेही कृष्णराज महाडिक यांनी स्पष्ट केले. सुरुवातीला वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार निवडणूक लढवण्याची तयारी होती, मात्र आता पक्षात झालेल्या अंतिम निर्णयानुसार हा निर्णय बदलल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, पक्षीय पातळीवर आपल्या नावाचा उमेदवारीसाठी विचार झाला, ही बाब आपल्यासाठी समाधानकारक आणि जमेची असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. भविष्यातही समाजकारण आणि संघटनात्मक कामात आपण सक्रिय राहणार असून, पक्षासाठी पूर्ण क्षमतेने काम करत राहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपल्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते, समर्थक आणि कुटुंबीयांचे त्यांनी यावेळी आभार मानले.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच कृष्णराज महाडिक यांनी प्रभाग क्रमांक तीनमधून अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी पारंपरिक पद्धतीने आजी, आई आणि वडिलांचे आशीर्वाद घेतले होते. या भावनिक क्षणाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अर्ज दाखल करताना त्यांच्या आई अरुंधती महाडिक, आजी आणि वहिनींनी औक्षण केले होते. कुटुंबीयांच्या आशीर्वादाने राजकीय प्रवासाची सुरुवात होत असल्याची भावना त्यांनी तेव्हा व्यक्त केली होती.

कृष्णराज महाडिक यांचा याआधी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मानस होता. मात्र त्या वेळी त्यांना संधी मिळाली नव्हती. 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते पुढील राजकीय वाटचालीसाठी तयारी करत असल्याची चर्चा सुरू होती. अशा स्थितीत थेट महानगरपालिका निवडणुकीत उडी घेतल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली होती. मात्र आता त्यांच्या माघारीमुळे प्रभाग क्रमांक तीनमधील लढतीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, कृष्णराज महाडिक यांच्या माघारीनंतर या प्रभागात महायुतीकडून कोणाला संधी मिळणार आणि काँग्रेसकडून सतेज पाटील कोणत्या उमेदवारावर विश्वास दाखवणार, याकडे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

"मला त्या PSI ने त्रास..." लातूरमध्ये तरुणाने संपवलं जीवन अन् पोलीस कर्मचाऱ्यांवर केले गंभीर आरोप!

    follow whatsapp