अमरावती महापालिका : 2017 मध्ये BJP ने मिळवलेली सत्ता, काँग्रेसचं आणि AMIM ची काय होती स्थिती?

Amravati Mahanagar Palika 2026 : अमरावती महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. 2017 मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपल्यानंतर महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती होता. त्यामुळे यंदाची निवडणूक केवळ सत्ता स्थापनेपुरती मर्यादित न राहता लोकशाही पुनर्स्थापनेची चाचणी म्हणून पाहिली जात आहे.

Amravati Mahanagar Palika 2026

Amravati Mahanagar Palika 2026

मुंबई तक

27 Dec 2025 (अपडेटेड: 27 Dec 2025, 04:53 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अमरावती महापालिका : 2017 साली BJP ने मिळवलेली सत्ता

point

काँग्रेसने 15 तर AMIM ने मिळवलेल्या 10 जागा

Amravati Mahanagar Palika 2026 , अमरावती : महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर विदर्भातील प्रमुख राजकीय केंद्र असलेल्या अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2017 नंतर तब्बल आठ वर्षांनी अमरावतीकरांना महापालिकेसाठी मतदानाचा हक्क मिळणार असून, गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली प्रशासक राजवट संपुष्टात येणार आहे.

हे वाचलं का?

अमरावती महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. 2017 मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपल्यानंतर महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती होता. त्यामुळे यंदाची निवडणूक केवळ सत्ता स्थापनेपुरती मर्यादित न राहता लोकशाही पुनर्स्थापनेची चाचणी म्हणून पाहिली जात आहे.

87 जागांसाठी निवडणूक; 6.77 लाख मतदार

अमरावती महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 22 प्रभागांमधील 87 नगरसेवकांच्या निवडीसाठी होणार आहे. यासाठी एकूण 6 लाख 77 हजार 180 मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये 3 लाख 37 हजार 935 महिला, 3 लाख 39 हजार 177 पुरुष, तर 68 तृतीयपंथी मतदार नोंदणीकृत आहेत. महापालिका क्षेत्रात 877 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण लागू असल्याने अमरावती महापालिकेत 43 ते 44 महिला नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे.

आरक्षणाची गणिते

87 जागांपैकी —

अनुसूचित जाती (SC) : 15 जागा

अनुसूचित जमाती (ST) : 2 जागा

ओबीसी : 23 जागा

सर्वसाधारण : 47 जागा

अशी आरक्षण रचना निश्चित करण्यात आली आहे. या आरक्षणामुळे उमेदवार निवडीत पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

2017 चा निकाल : भाजपचा वरचष्मा, पण विरोधकांची दमदार उपस्थिती

2017 च्या अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली होती. भाजपचे 45 नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसने 15, शिवसेनेने 7 जागा जिंकल्या होत्या. विशेष म्हणजे, त्या निवडणुकीत एआयएमआयएमने 10, बहुजन समाज पार्टीने 5, युवा स्वाभिमान पार्टीने 3 जागांवर विजय मिळवला होता. आरपीआय आठवले गटाला 1 जागा, तर 1 अपक्ष नगरसेवक निवडून आला होता. निवडणुकीनंतर भाजपचे चेतन गावंडे महापौर झाले होते.

प्रभाग रचना : 22 प्रभाग, चार-सदस्यीय वर्चस्व

राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार अमरावती महापालिकेची प्रभाग रचना पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे —

एकूण सदस्य : ८७

चार सदस्यीय प्रभाग : 21

तीन सदस्यीय प्रभाग : 1

एकूण प्रभाग : 22

ही रचना निवडणुकीत रणनीती आखताना पक्षांसाठी निर्णायक ठरणार आहे.

सध्याची राजकीय स्थिती : बहुपक्षीय लढत, बहुमताचा प्रश्न

सध्या अमरावती महापालिकेच्या राजकारणात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबतच युवा स्वाभिमान पार्टी आणि एआयएमआयएम यांचा प्रभाव दिसून येतो. त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे नवे घटक मैदानात उतरले आहेत. सर्व पक्षांनी जर स्वबळावर निवडणूक लढवली, तर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणे कठीण असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे यंदाची अमरावती महापालिका निवडणूक सत्तेसाठीची नव्हे, तर आघाड्या आणि राजकीय अस्तित्वाची लढाई ठरण्याची शक्यता आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई महापालिका : संजय राऊतांचे भाऊ निवडणूक लढण्यास इच्छुक, पण तोच विक्रोळीतील वार्ड राष्ट्रवादीला हवा

 

    follow whatsapp