जन आशिर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय लघू उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं दर्शन घेतलं. यानंतर शिवसैनिकांनी ही जागा गोमूत्र आणि दुधाने शुद्ध करुन घेतल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा वाद रंगला आहे. त्यातच रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनीही राणेंवर टीकेची तोफ डागली आहे.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांना नामोहरम करण्यासाठी केंद्र सरकार नारायण राणेंचा बुजगावण्यासारखा वापर करतंय, यासाठीच त्यांना पुढे आणलं आहे. फडणवीसांना शह देण्यासाठी राणेंचा वापर केला जाणं हे भाजपचं दुर्दैव आहे. नारायण राणेंसारख्या बाटग्याला बाळासाहेब कधीच आशिर्वाद देणार नाहीत. बाळासाहेबांनी नारायण राणेंना शाप दिला आहे की तुझ्यासारखा कृतघ्न आणि नतद्रष्ट माणूस महाराष्ट्रात जन्माला येऊ नये, असं म्हणत विनायक राऊतांनी राणेंवर टीका केली.
स्वतःचं मन शुद्ध करा, बाळासाहेबांचं स्मारक शुद्ध करणाऱ्या शिवसेनेला Narayan Rane यांनी सुनावलं
यावेळी नारायण राणेंसोबत समाधीस्थळावर आलेल्या फडणवीस आणि प्रवीण दरेकरांनाही राऊतांनी टोला लगावला. “देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर अनेकदा स्मारकावर बाळासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. तो त्यांचा अधिकार आहे. परंतू त्यांनीही नारायण राणेंच्या पदराआड लपून स्मारकाला भेट देऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न केला”.
दरम्यान, राणे निघून गेल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मारकाची जागा गोमूत्र आणि दुधाने शुद्धीकरण करणाऱ्या शिवसेनेलाही नारायण राणेंनी चांगलंच सुनावलं आहे. “आधी शिवसैनिकांनी आणि शिवसेनेने त्यांचं मन शुद्ध करावं. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाचा इतका अभिमान वाटत असेल तर बघा त्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाची गरज नाही. तिथे चिखल, दलदल झाली आहे. मी दिल्लीतही स्मारकं पाहिली आहेत अशी अवस्था एकाही स्मारकाची नसते.”
राज्याचे मुख्यमंत्री स्मारकाकडे लक्ष देत नाही का? सुशोभीकरणाचा पत्ता नाही. बाळासाहेबांचा फोटोही सरळ दिसत नाही. जे गोमूत्र शिंपडायला आले त्यांनी जरा ती अवस्था बघा. आधी स्वतःचं मन शुद्ध करा मग कारभार करा असं म्हणत राणेंनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलंय.
‘Balasaheb Thackeray यांचं स्मृतीस्थळ शुद्ध करणारे बुरसटलेल्या तालिबानी विचारांचे’
ADVERTISEMENT











