ठाकरेंना ‘मशाल’ देणारा बाळासाहेबांच्या मित्राचा पक्ष राजकारणातून नामशेष कसा झाला?

मुंबई तक

• 02:07 PM • 11 Oct 2022

केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी रात्री उशीरा ठाकरे गटाला मशाला हे नवीन चिन्ह दिलं. सोबतच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नावं देत ओळख देखील दिली. ठाकरे गटानं उगवता सुर्य आणि त्रिशूळ या चिन्हांची मागणी केली होती. मात्र त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह आणि उगवता सुर्य हे तमिळनाडूत द्रमुक पक्षाचे आरक्षित चिन्ह असल्याचं कारण आयोगाकडून देण्यात आलं. ठाकरे […]

Mumbaitak
follow google news

केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी रात्री उशीरा ठाकरे गटाला मशाला हे नवीन चिन्ह दिलं. सोबतच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नावं देत ओळख देखील दिली. ठाकरे गटानं उगवता सुर्य आणि त्रिशूळ या चिन्हांची मागणी केली होती. मात्र त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह आणि उगवता सुर्य हे तमिळनाडूत द्रमुक पक्षाचे आरक्षित चिन्ह असल्याचं कारण आयोगाकडून देण्यात आलं.

हे वाचलं का?

ठाकरे गटाला ‘मशाल’

त्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या तिसऱ्या पर्यायावर विचार करत त्यांना ‘मशाल’ हे चिन्ह देऊ केलं. मात्र मशाल हे चिन्हही कधीकाळी समता पक्षाचे राखीव चिन्ह होते. परंतु हा पक्ष आता देशाच्या राजकारणात औषधालाही सापडत नाही. निवडणुकांमध्ये कोणतीही लक्षणीय कामगिरी न करु शकल्याने आयोगाने हा पक्ष २००४ साली निष्क्रिय यादीत टाकला आहे. या पक्षाला आता राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा नाही.

समता पक्षाला मिळाली होती ‘मशाल’ :

नितीश कुमार आणि १४ खासदारांना सोबत घेत जॉर्ज फर्नांडिस यांनी जनता दलाशी फारकत घेतली. सर्वांनी एकत्र येत १९९४ मध्ये जनता दल (जॉर्ज) ची स्थापना केली. त्याच वर्षी या पक्षाचे नाव बदलून समता पक्ष करण्यात आले. तसेच मशाल हे निवडणूक चिन्ह मिळालं. १९९५ सालची बिहार विधानसभा निवडणुका समता पक्षाने स्वबळावर लढविली, परंतु केवळ ७ जागांवर यश मिळालं.

१९९९ च्या निवडणूका NDA ने पुन्हा जिंकल्या. वाजपेयी सरकारमध्ये जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार यांना प्रमुख मंत्रालयांची जबाबदारी मिळाली. नितीश कुमार रेल्वेमंत्री, कृषीमंत्री तर जॉर्ज संरक्षण मंत्री होते. १९९९ च्या निवडणूका NDA ने पुन्हा जिंकल्या. वाजपेयी सरकारमध्ये जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार यांना प्रमुख मंत्रालयांची जबाबदारी मिळाली. नितीश कुमार रेल्वेमंत्री, कृषीमंत्री तर जॉर्ज संरक्षण मंत्री होते. १९९९ च्या निवडणूका NDA ने पुन्हा जिंकल्या. वाजपेयी सरकारमध्ये जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार यांना प्रमुख मंत्रालयांची जबाबदारी मिळाली. नितीश कुमार रेल्वेमंत्री, कृषीमंत्री तर जॉर्ज संरक्षण मंत्री होते.

समता पक्षानं दोन मुख्यमंत्री दिले :

२००० मध्ये भाजपाच्या मदतीने नितीश कुमार पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले. पण ८ दिवसासाठीच. विश्वासमत न जिंकू शकल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि ते पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात गेले. याशिवाय १५ फेब्रुवारी २००३ रोजी राधाबिनोद कोईजम यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर ते समता पक्षाचे दुसरे मुख्यमंत्री बनले. मात्र त्याच वर्षी मे महिन्यात त्यांच सरकार पडलं.

समता पक्षाचं विलीनीकरण :

पुढे २००३ मध्ये शरद यादव यांच्या नेतृत्वातील जनता दल, जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वात समता पक्ष आणि लोकशक्ती पक्ष यांनी एकत्रित येत जनता दल यूनायटेची स्थापना केली. मात्र समता पक्षाचे खासदार ब्रह्मानंद मंडल आणि इतर सदस्यांनी या विलीनीकरणाला विरोध केला.

सर्वांनी विलीनीकरणाविरोधात निवडणूक आयोगाकडे दाद मागितली. सर्व सदस्यांचा पाठिंबा दिला नसल्यामुळे आयोगानेही विलीनीकरणाला मान्यता दिली नाही. अखेर आयोगाने विलीनीकरण तांत्रिकदृष्ट्या पूर्ण नसल्याचे सांगत समता पक्षाच्या नावाखाली एका गटाला काम करण्याची परवानगी दिली.

पक्ष राजकारणातून बाहेर :

मात्र त्यानंतर निवडणुकीत कोणतेही यश येत नसल्याने २००४ साली या पक्षाचा राज्यस्तरीय दर्जाही गेला. परिणामी या पक्षाचे मशाल हे चिन्हही गेलं. त्यामुळे या पक्षाला आता कोणतेही अधिकृत चिन्ह नसून निवडणूक लढविताना मुक्त चिन्हांच्या यादीतील चिन्हांची निवड करावी लागते. याच पक्षाचं मशाल हे चिन्ह आता ठाकरे गटाला मिळालं आहे.

    follow whatsapp