Shraddha Murder श्रद्धाप्रमाणेच Dexter वेबसीरिज पाहून जगभरात झाल्या आहेत ‘इतक्या’ हत्या

मुंबई तक

15 Nov 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:02 AM)

वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकरची तिच्या प्रियकराने निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडेही केले. या प्रकरणात तिचा प्रियकर आफताबला अटक करण्यात आली. आफताबने पोलिसांना हे सांगितलं आहे की त्याने अमेरिकन वेब सीरिज Dexter पाहून मृतदेहाचे तुकडे करण्याचं त्याने ठरवलं होतं असं सांगितलं. डेक्स्टर ही वेबसीरिजही आफताबने पाहिली होती डेक्स्टर ही वेबसीरिजही आफताबने पाहिली होती. […]

Mumbaitak
follow google news

वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकरची तिच्या प्रियकराने निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडेही केले. या प्रकरणात तिचा प्रियकर आफताबला अटक करण्यात आली. आफताबने पोलिसांना हे सांगितलं आहे की त्याने अमेरिकन वेब सीरिज Dexter पाहून मृतदेहाचे तुकडे करण्याचं त्याने ठरवलं होतं असं सांगितलं.

हे वाचलं का?

डेक्स्टर ही वेबसीरिजही आफताबने पाहिली होती

डेक्स्टर ही वेबसीरिजही आफताबने पाहिली होती. श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्याची आयडिया त्याला याच वेब सीरिजमध्ये मिळाली. पोलिसांनी हेदेखील सांगितलं की आफताबच्या आयुष्यात अनेक मुली होत्या. त्यामुळे श्रद्धा आणि आफताबमध्ये खटके उडत होते. त्याचा हा कट सहा महिने यशस्वीही ठरला असंही म्हणता येईल पण अखेर प्रेमाच्या ३५ तुकड्यांना वाचा फुटली.

मात्र ही पहिली वेळ नाही. जगभरात Dexter ही अमेरिकन वेबसीरिज पाहून आत्तापर्यंत चार हत्यांची प्रकरणं समोर आली आहेत. डेक्सटर वेब सीरिज पाहून फक्त हत्याच करण्यात आल्या नाहीत तर पुरावे नष्ट करून पोलिसांची दिशाभूलही करण्यात आली.

२०११ मध्ये घडली होती पहिली घटना

अमेरिकन वेब सीरिज डेक्सटरवरून आयडिया घेऊन खून करण्यातची पहिलं प्रकरण २०११ मध्ये झालं होतं. २०११ मध्ये कॅनडातल्या एका फिल्ममेकरला अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याने तीन वर्षांपूर्वी केलेल्या एका खुनाची उकल झाली होती. फिल्म मेकर मार्क अँड्र्यू ट्विशेलने एक हत्या केली होती. या प्रकरणात त्याला अटक करण्यातआली. मार्कने २००८ मध्ये हत्या केली होती. जेव्हा हे प्रकरण कोर्टात उभं राहिलं तेव्हा मार्कने स्वतःला डेक्सटर वेब सीरिजमधल्या कॅरेक्टरप्रमाणे सादर करण्याचा प्रयत्न केला होता.

या केसचं वैशिष्ट्य काय होतं?

मार्कने जी हत्या केली त्यासाठी त्याने आधी एक रिक्रिएशन किल रूम तयार केली होती. तिथे तो काल्पनिक साधनांसह खून करायचा सराव करत होता आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्याचाही सराव करत होता.

अमेरिकेतच घडलं होतं दुसरं प्रकरण

डेक्सटर सीरीज आणि हत्येचं आणखी एक प्रकरण हे २०१४ मध्ये उघडकीस आलं होतं. अमेरिकेतल्या एका अल्पवयीन मुलाने त्याच्या १७ वर्षाच्या गर्लफ्रेंडची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्या तुकड्यांची त्याने विल्हेवाट लावली. कोर्टाने या प्रकरणात खुन्याला २५ वर्षांची शिक्षा सुनावली होती.

तिसरं प्रकरण नेमकं काय होतं?

याआधी २०११ मध्ये २८ वर्षांच्या शमरेज खानला पोलिसांनी अटक केली होती. त्याने एक पाकिस्तानी महिला फाइजा अशरफची हत्या करण्यासाठी एक किलर हायर केला होता. पोलिसांपुढे शमरेज खानने हे कबूल केलं होतं की त्यानेही डेक्सटर वेब सीरिज पाहूनच पाकिस्तानी महिलेची हत्या करण्याचं ठरवलं होतं. मात्र हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्याचा कट यशस्वी झाला नाही.

    follow whatsapp