International Yoga Day : बर्फाच्या लादीवर १ तास ४८ सेकंद योगसाधना, लहानग्या श्रेया शिंदेचा अनोखा विक्रम

भारतासह जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. सध्याच्या धकाधकीच्या जिवनात स्वतःचं आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य सुरक्षित ठेवण्यासाठी योगसाधनेचा चांगला फायदा होतो. नेत्यांपासून अभिनेत्यांनी आज योगसाधना करत आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. १३ वर्षीय श्रेया शिंदे या मुलीने बर्फाच्या लादीवर १ तास ४८ सेकंद योगसाधना करत एका अनोख्या विक्रमाची नोंद केली […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:25 AM • 21 Jun 2021

follow google news

भारतासह जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. सध्याच्या धकाधकीच्या जिवनात स्वतःचं आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य सुरक्षित ठेवण्यासाठी योगसाधनेचा चांगला फायदा होतो. नेत्यांपासून अभिनेत्यांनी आज योगसाधना करत आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. १३ वर्षीय श्रेया शिंदे या मुलीने बर्फाच्या लादीवर १ तास ४८ सेकंद योगसाधना करत एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.

हे वाचलं का?

१३ वर्षीय श्रेया ही मुळची माढा तालुक्यातील मुळगाव या गावची…परंतू सध्या ती डोंबिवलीत राहते. १ तास ४८ सेकंद बर्फाच्या लादीवर १०० पेक्षा जास्त योगासन करत श्रेयाने जागतिक वर्ल्ड बुकमध्ये आपलं नाव कोरलं आहे. तिच्या या पराक्रमाबद्दल सर्व स्तरातून तिचं कौतुक होतंय.

श्रेयाची आई योग शिक्षिका असल्यामुळे योगसाधनेचं बाळकडून तिला लहानपणापासूनच मिळालं होतं. याव्यतिरीक्त श्रेयाच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. योग शिक्षक प्रवीण बेंडकर आणि श्रुती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेयाने हा विक्रम केला आहे.

    follow whatsapp