बाप रे बाप ! एका रात्रीत सापाने फस्त केली सशाची १६ पिल्लं

सापाच्या तावडीत एखादा प्राणी सापडला की त्याचा कशा पद्धतीने अंत होतो हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या करवण गावात एक विचीत्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सापाने पाळीव सशाचा एक-दोन नव्हे तर १६ पिल्लांचा फडशा पाडला आहे. करवण गावातील शेतकरी दिवाकर चौधरी यांनी त्यांच्या घरी एक ससा पाळला होता. या सशाने नंतर पिल्लांना […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 11:01 AM • 02 Oct 2021

follow google news

सापाच्या तावडीत एखादा प्राणी सापडला की त्याचा कशा पद्धतीने अंत होतो हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या करवण गावात एक विचीत्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सापाने पाळीव सशाचा एक-दोन नव्हे तर १६ पिल्लांचा फडशा पाडला आहे.

हे वाचलं का?

करवण गावातील शेतकरी दिवाकर चौधरी यांनी त्यांच्या घरी एक ससा पाळला होता. या सशाने नंतर पिल्लांना जन्म दिला. रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात बाहेर पडलेल्या सापाने सर्वात आधी सशाला दंश करुन नंतर त्याच्या पिल्लांचा फडशा पाडला. सापाने केलेला हा प्रताप कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकाराबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दिवाकर चौधरी यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ सर्पमित्राला पाचारण केलं. सर्पमित्राने या सापाला पकडलं. यानंतर सापाने गिळलेली सशाची १६ पिल्ल बाहेर काढली. हा सर्व प्रकार ऐकून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

    follow whatsapp