पंढरपूर- मोहोळ रस्त्यावर कारचा भीषण अपघात एकाच कुटुंबातील सहा जण ठार

मुंबई तक

• 04:42 PM • 22 May 2022

पंढरपूर मोहोळ रस्त्यावर रविवारी सायंकाळच्या सुमारास स्कॉर्पिओ आणि कारची समोरासमोर धडक झाली. यामध्ये मोहळ मधील डॉक्टर आफ्रीन अत्तार या पती-पत्नी यांच्यासह दोन मुलांसह इतर कुटुंबातील सहा लोक जागीच ठार झाले आहेत. महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन्ही कार भरधाव वेगाने धावत होत्या याच वेळी हा अपघात झाला. यामध्ये दोन्ही कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात डॉ. […]

Mumbaitak
follow google news

पंढरपूर मोहोळ रस्त्यावर रविवारी सायंकाळच्या सुमारास स्कॉर्पिओ आणि कारची समोरासमोर धडक झाली. यामध्ये मोहळ मधील डॉक्टर आफ्रीन अत्तार या पती-पत्नी यांच्यासह दोन मुलांसह इतर कुटुंबातील सहा लोक जागीच ठार झाले आहेत. महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन्ही कार भरधाव वेगाने धावत होत्या याच वेळी हा अपघात झाला. यामध्ये दोन्ही कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.

हे वाचलं का?

या अपघातात डॉ. आफरिन मुजाहिद अत्तार, डॉ. मुजाहिद अत्तार, मुलगा अरमान अत्तार, डॉ. आफरीन यांचे बंधू इरफान खान, त्यांच्या पत्नी बेनझीर इरफान खान, मुलगी अनाया इरफान खान या सहा ही जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर स्कॉर्पिओ गाडी मधील राजेंद्र हुंडेकरी, रामचंद्र शेटे मंदाकिनी शेटे हे सर्व जखमी झाल्याची माहिती आहे.

अत्तार आणि खान कुटुंबातील सदस्य आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. आज मोहोळला परतत असताना पेनूर जवळच्या माळी पाटी जवळ पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीची त्यांच्या कारला जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की खान यांच्या कारचा समोरील भाग अक्षरशः चक्काचूर झालाय. अपघात पाहून स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करण्याचे प्रयत्न केले. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना सोलापुरात उपचारासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती आहे. तर मृतांना मोहोळ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलीस घटना स्थळी पोहोचले. अपघातग्रस्त मृतदेह शवविच्छेदन प्रक्रियेसाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. मोहोळ-पंढरपूर रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने व वाहतुकीला अडथळा करणारी वाहने रस्त्याच्या बाजूला काढून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, मोहोळ पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.

    follow whatsapp