सौदी अरेबियाने पहिल्यांदाच केलं असं काही की, जगभरातील मुस्लिम भडकले

जगाचे इस्लामचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौदी अरेबियात हॅलोविनच्या रंगाचे कपडे घातलेल्या लोकांचे फोटो सोशल मीडियावर येताच एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. वास्तविक, काही वर्षांपूर्वीपर्यंत सौदी अरेबियामध्ये असे काही करणे एखाद्या मोठ्या गुन्ह्यापेक्षा कमी नव्हते. पण मोहम्मद बिन सलमान (MBS) क्राऊन प्रिन्स झाल्यापासून सौदीतील इस्लामिक रीतिरिवाजांमध्ये झालेल्या आधुनिक बदलाचा पुरावा यंदाच्या हॅलोविनचा आहे. सौदी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:50 AM • 31 Oct 2022

follow google news

जगाचे इस्लामचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौदी अरेबियात हॅलोविनच्या रंगाचे कपडे घातलेल्या लोकांचे फोटो सोशल मीडियावर येताच एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. वास्तविक, काही वर्षांपूर्वीपर्यंत सौदी अरेबियामध्ये असे काही करणे एखाद्या मोठ्या गुन्ह्यापेक्षा कमी नव्हते. पण मोहम्मद बिन सलमान (MBS) क्राऊन प्रिन्स झाल्यापासून सौदीतील इस्लामिक रीतिरिवाजांमध्ये झालेल्या आधुनिक बदलाचा पुरावा यंदाच्या हॅलोविनचा आहे.

हे वाचलं का?

सौदी अरेबिया सरकारने हॅलोविन साजरा करण्याची परवानगी दिली असली तरी, सर्व मुस्लिम लोकांना सौदी सरकारचा हा निर्णय फारसा आवडणारा नाही. यामुळेच सोशल मीडियावर लोकांमध्ये हॅलोविन साजरे करणे हा हराम आणि हलालचा मुद्दा बनला. मोठ्या संख्येने लोक याला हराम म्हणतात, म्हणजेच इस्लाममध्ये जे पूर्णपणे चुकीचे आहे ते करणे. त्याचवेळी अनेकांनी बचावही केला.

सौदी अरेबियामध्ये मोठ्या बदलांचे संकेत

सौदीमध्ये साजऱ्या होणाऱ्या हॅलोविनबाबत काही लोकांनी असेही सांगितले की, सौदी अरेबिया केवळ ट्रेंड फॉलो करत आहे. काही लोकांनी याला मोहम्मद बिन सलमान यांच्या राजवटीत सौदी अरेबियामध्ये मोठ्या बदलांचे संकेतही म्हटले आहे. ट्विटरवर एका युजरने म्हटले की, ‘मी पाहिले की, मोठ्या संख्येने मुस्लिम लोक यावर्षी हॅलोविन साजरे करत आहेत. मुस्लिम असल्याने हॅलोवीन साजरे करण्यावर बंदी आहे, अल्लाह आम्हा सर्वांना क्षमा करो.’

त्याच वेळी, दुसऱ्या युजर्सने म्हटले की जर सौदी अरेबियामध्ये हॅलोविन साजरा केला जात असेल तर याचा अर्थ असा की विनाश दूर नाही. आमच्या पैगंबराचा पारंपारिक पोशाख सैतानाचा मुखवटा घालून परिधान केला जात आहे, यात काही विनोद नाही, असे युजरने म्हटले आहे. आणखी एक युजर म्हणाला की सौदी अरेबियाला काय झाले आहे? हे लोक आता हॅलोविन साजरे करत आहेत का? माझ्या समजल्याप्रमाणे इस्लाममध्ये ते हराम आहे. एका युजरने म्हटले की, संपूर्ण जगाला माहित आहे की इस्लाम काय आहे, मग तुम्ही इस्लामच्या विरोधात का जात आहात. सौदीमध्ये हॅलोविन सुरू करू नका आणि अल्लाहला घाबरा.

इस्लाममध्ये सौदी अरेबियाला वेगळं महत्व

आपल्या आयुष्यात सौदी अरेबियाच्या मक्का आणि मदिना मशिदीत यावे ही जगातील प्रत्येक मुस्लिमाची इच्छा असते. कोणी हज करण्यासाठी तेथे पोहोचले तर कोणी उमराह करून तेथे जाऊन ईश्वर भक्तीत लीन व्हावे असे वाटते. जेव्हा लोक हजला जातात तेव्हा शेवटच्या दिवसात एक प्रक्रिया असते, ज्यामध्ये तीन खांबांवर हजला जाणारे लोक दगडांचा वर्षाव करतात. हे खांब सैतानाचे स्वरूप मानले जातात.

हजशी संबंधित ही प्रथा सौदी अरेबियामध्ये सैतानाचा दर्जा काय आहे हे स्पष्टपणे दर्शवते. हॅलोविन हा एक सण आहे जो आसुरी शक्तींशी संबंधित आहे आणि या कारणास्तव लोक भूत किंवा इतर भयानक देखावा घेऊन हँग आउट करतात. त्यामुळे हॅलोविनसारखा सण कोणत्याही इस्लामिक राष्ट्रात साजरा केला जाणे हे मुस्लिम लोकांसाठीही विचित्र आहे.

मात्र, यावेळी सौदी अरेबियातील चित्र वेगळे होते. राजधानी रियाधबद्दल बोलायचे झाले तर अनेक भागातील रस्त्यांवर सैतानांच्या रूपात फिरणारे लोक दिसले. पारंपारिक सौदी पोशाखात अनेकांनी भितीदायक देखावा केला आणि पार्टीत सामील झाले.

मोहम्मद बिन सलमान सतत सौदी अरेबियात बदल आणत आहेत

क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे सौदीच्या इतिहासातील पहिले क्राउन प्रिन्स आहेत ज्यांनी इस्लामिक राष्ट्रात अशा बदलांना प्रोत्साहन दिले आहे. मात्र, त्याबाबत काही प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहे आणि अनेक लोक यावर सातत्याने टीका करत आहेत. सौदीमध्ये महिलांना गाडी चालवण्याची परवानगी असो किंवा पहिला सिनेमा हॉल सुरू करणं असो किंवा आता हॅलोवीन साजरे करणं असो, एमबीएस बदलासाठी फर्मान जारी करत आहे.

    follow whatsapp