महाविकास आघाडी सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. तरीही आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी अजित पवारांनी अर्थसंकल्पात ७५०० कोटींची तरतूद केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा प्रश्न चांगलाच गाजला होता. राज्यातील महाविकास आघाडी सरकार यावरुन केंद्रातील मोदी सरकारला चांगलंचं धारेवर धरत होती.
ADVERTISEMENT
Budget : ७२ मिनिटांच्या भाषणात पेट्रोल-डिझेलचा साधा उल्लेखही नाही
अर्थसंकल्प सादर करत असताना अजित पवार पेट्रोल आणि डिझेलवर राज्य सरकार आकारत असलेल्या करांमध्ये कपात करतील अशी सर्वांना आशा होती. परंतू आपल्या दीड तासाच्या भाषणात अजित पवारांनी या विषयाला हातच घातला नाही. त्यामुळे राज्य सरकारला आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर बोलण्याचा हक्क नसल्याची प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पेट्रोल-डिझेल दरवाढीसाठी केंद्राला दोषी धरत असताना राज्याने आपल्या करांमध्ये कपात करावी अशी मागणी भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून केली जात होती.
परंतू अर्थसंकल्पात अजित पवारांनी अशी कोणतीही घोषणा केली नसल्यामुळे पुढचा काहीकाळ सामान्य जनतेला पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे चटके सोसावे लागणार आहेत. दरम्यान आजच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी आरोग्य, कृषी आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमीत्त राज्यातील महिला वर्गाला दिलासा देणाऱ्या योजनांची घोषणा केली आहे.
Budget : महिलांच्या नावे घराची नोंदणी झाल्यास मुद्रांक शुल्कात सुट
ADVERTISEMENT
