जस्ट डायलचा वापर वेश्या व्यवसायासाठी ? स्पा, मसाजच्या चौकशीनंतर समोर आलं 150 मुलींचं ‘रेटकार्ड’

मुंबई तक

• 07:15 AM • 09 Nov 2021

सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. संवाद आणि संपर्काचं एक प्रमुख माध्यम म्हणून याकडे पाहिलं जातं. विविध अॅप, पोर्टल, वेबसाईट सध्या माहितीचा मोठा खजिनाच घेऊन इंटरनेटवर उपलब्ध आहेत. जस्ट डायल हे अशाच एका अॅपपैकी असलेलं एक अॅप आहे. यावर तुम्हाला ज्या गोष्टीची गरज असते म्हणजे मेडिकल नंबर, रूग्णालयं, पोलीस स्टेशन आदी आवश्यक नंबर्स मिळतात. […]

Mumbaitak
follow google news

सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. संवाद आणि संपर्काचं एक प्रमुख माध्यम म्हणून याकडे पाहिलं जातं. विविध अॅप, पोर्टल, वेबसाईट सध्या माहितीचा मोठा खजिनाच घेऊन इंटरनेटवर उपलब्ध आहेत. जस्ट डायल हे अशाच एका अॅपपैकी असलेलं एक अॅप आहे. यावर तुम्हाला ज्या गोष्टीची गरज असते म्हणजे मेडिकल नंबर, रूग्णालयं, पोलीस स्टेशन आदी आवश्यक नंबर्स मिळतात. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांना जस्ट डायलचा आलेला अनुभव मात्र वेगळा आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे स्वाती मालीवाल यांनी?

आम्ही जस्ट डायलवर फोन करुन स्पा मसाजची खोटी चौकशी केली. त्यानंतर आम्हाला 50 मेसेज आले, ज्याद्वारे आम्हाला 150 पेक्षा अधिक मुलींचे दर सांगण्यात आले. मी जस्ट डायल आणि दिल्ली पोलीस गुन्हे शाखेला समन्स बजावत आहे. या धंद्याला चालना देण्यासाठी जस्ट डायलची भूमिका काय? असा प्रश्न स्वाती मालीवाल यांनी विचारला आहे. मालीवाल यांनी या ट्विटमध्ये या मेसेजेसचा स्क्रिनशॉटही पोस्ट केला आहे.

दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी जस्ट डायल या साईटवरुन स्पा मसाजबद्दल खोटी चौकशी केली. त्यानंतर त्यांना 150 हून अधिक मुलींचे ‘रेट्स’ सांगणारे मेसेजेस आले. त्यासोबत या मुलींचे फोटोही पाठवण्यात आले होते. मालीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती दिली आहे.

दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करायची आहे. त्यामुळे नोटीस पाठवण्यात आली आहे. जस्ट डायल स्वतः या प्रकरणात एक पक्ष आहे. मी शक्य आहे ती सर्व कारवाई करणार आहे. दोषींना शिक्षा झाली पाहिजे. हे खपवून घेतलं जाणार नाही असंही दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी म्हटलं आहे. दरम्यान दिल्लीत स्पा आणि मसाज सेंटर यांच्या नावाखाली अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याची माहिती आहे. पोलीस या ठिकाणी वेळोवेळी छापे टाकतात.

    follow whatsapp