समीर वानखेडेंना दणका! सद्गुरू बारचा परवाना रद्द, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

मुंबई तक

• 04:34 AM • 02 Feb 2022

एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या नावे असलेल्या बार आणि रेस्तराँचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सद्गुरू बार आणि रेस्तराँचा परवाना रद्द करण्याचे आदेश आले आहेत. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्काने समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. वयाच्या 17 व्या वर्षी नावावर बारचा परवाना घेतल्याने राज्य […]

Mumbaitak
follow google news

एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या नावे असलेल्या बार आणि रेस्तराँचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सद्गुरू बार आणि रेस्तराँचा परवाना रद्द करण्याचे आदेश आले आहेत. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्काने समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. वयाच्या 17 व्या वर्षी नावावर बारचा परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्काने ही नोटीस बजावली होती.

हे वाचलं का?

समीर वानखेडे यांनी 1997 मध्ये बार आणि रेस्तराँचा परवाना घेताना खोटी कागदपत्रं सादर केल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र प्रतिबंध कायद्याच्या कलम 54 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंवर आरोप केला होता की, अवघ्या 17व्या वर्षी त्यांना बारचा परवाना मिळाला होता. नवी मुंबईत असलेला सदगुरू रेस्ट्रो बारचा परवाना हा समीर वानखेडे यांच्या नावावर होता. समीर वानखेडे यांच्या नावावर हा बारचा परवाना झाला त्यावेळी त्यांचे वय अवघे 17 वर्षे होते. अल्पवयीन असतानाही बारचा परवाना कसा मिळाला. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाने समीर वनाखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

बारच्या परवान्यासाठी किमान 21 वयाची अट आहे. मात्र, असे असतानाही त्यांना बारचा परवाना मिळाला. 27 ऑक्टोबर 1997 रोजी समीर वानखेडेंच्या नावे बारचा परवाना काढण्यात आला होता. समीर वानखेडे यांचे वडील त्यावेळी उत्पादन शुल्क विभागाक कार्यरत होते. याप्रकरणी आता समीर वनाखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तुमच्या नावे असलेला बार परवाना रद्द का करु नये अशी विचारणा करण्यात आली आहे.

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे व्याही आहेत. राऊत यांची कन्या हिचा विवाह नार्वेकर यांचा मुलगा मल्हार याच्यासोबत झाला आहे. वानखेडेंवर कारवाई करण्याची जबाबदारीही नार्वेकर यांच्यावर आली होती.

मलिक काय म्हणाले होते?

समीर वानखेडेंनी स्वतःच्या संपत्तीचं विवरण पत्र भरलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की, ठाणे नवी मुंबईतील सदगुरू ट्रक टर्मिनस हॉटेल १९९५ ची किंमत १ कोटी. हे त्यांच्या आईवडिलांकडून ती मिळालेली असून, त्याचं भाडं वर्षाला २ लाख ४० इतकं येतं. त्यानंतर त्यांनी अलिकडेच त्यांच्या विभागाला माहिती दिली की, वडील ज्ञानदेव वानखेडे आणि स्वतः अशी ही संयुक्त प्रॉपर्टी असून, २ लाख ४० हजार भाडे येत आहे. २४ वर्षांपासून समीर वानखेडेंच्या नावे घोळ केला जात आहे

    follow whatsapp