ठाणे : व्हेल माशाची उलटी विकण्याचा प्रयत्न करणारे दोन जण जेरबंद

व्हेल माशाची उलटी विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तस्करांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून व्हेल माशाची उलटी आणि एक मोटारबाईक जप्त करण्यात आली आहे. बाजारात या उलटीची किंमत ही ४ कोटींच्या घरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ठाण्याच्या घोडबंदर परिसरात दोन जणं व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:26 AM • 03 Jul 2021

follow google news

व्हेल माशाची उलटी विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तस्करांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून व्हेल माशाची उलटी आणि एक मोटारबाईक जप्त करण्यात आली आहे. बाजारात या उलटीची किंमत ही ४ कोटींच्या घरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे वाचलं का?

ठाण्याच्या घोडबंदर परिसरात दोन जणं व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. यावरुन पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजता जकात नाका, घोडबंदर परिसरात सापळा रचला. यावेळी दोन संशयत बाईकवरुन फिरताना पोलिसांना दिसले.

या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता त्यांच्याकडे व्हेल मालाशी उलटी सापडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांच्याजवळचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत.

    follow whatsapp