नांदेडच्या सगरोळी वाळू घाटात अनोळखी युवकाचं प्रेत सापडल्याने खळबळ

मुंबई तक

• 10:10 AM • 09 Apr 2022

नांदेडमधल्या बिलोली तालुक्यातील मौजे सगरोळीच्या मांजरा नदी पात्रात शुक्रवारी सकाळी एका पुरूषाचं प्रेत आढळलं आहे. अनोळखी युवकाचं प्रेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या युवकाचं वय ३५ होतं असं पोलिसांनी सांगितलं. संशयास्पद मृतदेह पाण्यात आढळून आला. ही बातमी पोलिस प्रशासनास समजताच पोलीस निरीक्षक डोईफोडे यांनी इथल्या रेती घाटात या मृतदेहाचा पंचनामा केला आणि आरोग्य […]

Mumbaitak
follow google news

नांदेडमधल्या बिलोली तालुक्यातील मौजे सगरोळीच्या मांजरा नदी पात्रात शुक्रवारी सकाळी एका पुरूषाचं प्रेत आढळलं आहे. अनोळखी युवकाचं प्रेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या युवकाचं वय ३५ होतं असं पोलिसांनी सांगितलं. संशयास्पद मृतदेह पाण्यात आढळून आला. ही बातमी पोलिस प्रशासनास समजताच पोलीस निरीक्षक डोईफोडे यांनी इथल्या रेती घाटात या मृतदेहाचा पंचनामा केला आणि आरोग्य विभागास पाचारण करून त्याच ठिकाणी शवविच्छेदन केलं. त्यानंतर सगरोळी ग्रामपंचायतीच्या मदतीने सदर मृतदेहाचा कुठलेही ओळख न पटवताच स्मशानभूमित दोन ते तीन तासात अंत्यसंस्कार केले, त्यामुळे ही घटना लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

हे वाचलं का?

बिलोली तालुक्यातील तेलंगण महाराष्ट्र राज्याच्या सिमेवर सगरोळी गावालगत असलेल्या वाळू घाटात एका अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्ष वयोगटातील युवकाचे प्रेत सडलेल्या अवस्थेत ८ एप्रिल रोजी सापडले आहे. या बाबतची माहिती बिलोली पोलीसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरिक्षक रामदास केंद्रे यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर या प्रकरणी पंचनामा करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी बालाजी सातमवार यांनी शवविच्छेदन केल्यानंतर गावकऱ्यांनी अंत्यविधी केले.

याप्रकरणी पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आता हा नेमका प्रकार काय आहे? त्या दिशेने पोलीस निरिक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक रामदास केंद्रे हे तपास करीत आहेत. गेल्या महिना भरापासून हा वाळू घाट चालू असून सध्या पाच ते सहा दिवसा पासून बंद आहे.जेसीबीच्या सहाय्याने वाळूचे उत्खनन होत असल्याने घाटात पाच ते दहा फुटा पर्यत खड्डे खणण्यात आले आहेत. अशाच एका पाण्याने भरलेल्या खड्ड्यात हे प्रेत सडलेल्या अवस्थेत आढळून आलं. सदर वाळू घाट चालू झाल्या पासून या ना त्या कारणाने चर्चेत असून आता पुन्हा याच घाटात हे प्रेत आढळून आल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

    follow whatsapp