मुळशी पॅटर्न.. 5 वर्षांपूर्वी छोट्या भावाचा खून, आता मोठ्या भावाचीही हत्या

मुंबई तक

06 Mar 2023 (अपडेटेड: 23 Mar 2023, 08:39 PM)

Nashik Crime: नाशिक: नाशिकच्या (Nashik) पेठरोड परिसरातील शनि मंदिर येथील रहिवासी किरण गुंजाळ याची दिंडोरी रोडवरील अभिषेक स्वीट्ससमोर सायंकाळी भर रस्त्यात धारधार शस्त्राने वार करून हत्या (Murder) करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली असून मयत हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समजते आहे. (the killing season continues in nashik a 27 year old chili trader was killed […]

Mumbaitak
follow google news

Nashik Crime: नाशिक: नाशिकच्या (Nashik) पेठरोड परिसरातील शनि मंदिर येथील रहिवासी किरण गुंजाळ याची दिंडोरी रोडवरील अभिषेक स्वीट्ससमोर सायंकाळी भर रस्त्यात धारधार शस्त्राने वार करून हत्या (Murder) करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली असून मयत हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समजते आहे. (the killing season continues in nashik a 27 year old chili trader was killed in panchvati area)

हे वाचलं का?

2018 साली किरण गुंजाळ याच्या लहान भावाचा देखील खून करण्यात आला होता. मृत किरण गुंजाळ हा कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची विक्रीचा व्यवसाय करत होता. तर पेठ रोडवरील शनी मंदिर, नवनाथ नगर येथील रहिवासी होता.

3 ते 4 जणांनी हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांना आहे. हल्लेखोरांनी किरणचा जवळपास 5 ते 7 किमी पाठलाग केला. त्यानंतर तो हाती सापडताच त्याची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ज्यामुळे संपूर्ण नाशिकमध्ये एकच खळबळ पसरली आहे. सध्या पोलीस या संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही तपासणीचे काम करत असून आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पोलिसांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, ही हत्या पूर्ववैमनस्यातूनच झाली असावी. ऐन होळीच्या दिवशी अशा पद्धतीने भररस्त्यात नाशिकमध्ये हत्या झाल्याने नाशिककरांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे.

दरम्यान, या हत्येची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मोठा पोलीस फौजफाट तिथे पोहचला. ज्यामध्ये पोलीस उपायुक्त डॉ किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त गंगाधर सोनवणे, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे, गुन्हे शाखेचे विजय ढमाळ, अधिक तपासासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली होती.

नाशिक : प्रेम प्रकरणातून तरुणाला जिवंत पेटवलं; मुलीसह आईवडील, भाऊ पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. दिवसाढवळ्या अशाप्रकारे एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याने पोलीस प्रशासनाचे देखील धाबे दणाणले आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर आरोपींना अटक करून गुन्हेगारांना जरब बसविण्याचं मोठं आव्हान नाशिक पोलिसांसमोर असणार आहे.

नाशिक : डॉ. सुवर्णा वाजे जळीतकांडाची उकल, पतीकडूनच हत्या झाल्याची पोलिसांची माहिती

    follow whatsapp