पैसे घेऊन गद्दारी केलेल्यांना सोडणार नाही – मनसे आमदार राजु पाटील यांचा इशारा

मुंबई तक

• 02:18 AM • 22 Feb 2022

राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत. निवडणुक आयोगातर्फे येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली यासह अन्य महत्वाच्या महामालिकांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात येऊ शकते. कल्याण-डोंबिवलीमध्ये मात्र याआधी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची फोडाफोडी आणि राजकारणाला सुरुवात झाली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजु पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना पैसे घेऊन गद्दारी केलेल्यांना सोडणार नाही असं म्हणत, मनसेची […]

Mumbaitak
follow google news

राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत. निवडणुक आयोगातर्फे येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली यासह अन्य महत्वाच्या महामालिकांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात येऊ शकते. कल्याण-डोंबिवलीमध्ये मात्र याआधी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची फोडाफोडी आणि राजकारणाला सुरुवात झाली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजु पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना पैसे घेऊन गद्दारी केलेल्यांना सोडणार नाही असं म्हणत, मनसेची साथ सोडणाऱ्यांना इशारा दिला आहे.

हे वाचलं का?

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जणं पक्ष सोडून जात असल्याची अफवा पसरवली जात आहे. असा प्रयत्न कोणी करणार असेल तर मी त्याला बघून घेईन असा इशारा राजु पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी बोलत असताना पाटील यांनी फोडाफोडीचं राजकारण आम्हालाही करता येतं असं म्हणत इतर पक्षातील नेत्यांना इशारा दिला आहे.

मनसे पक्ष सोडून गेलेले भोंगे लोकसभा निवडणुकीत विकले गेले, माझी आमदारकीही यांनी विकली असती. पैसे घेऊन राज ठाकरेंशी ज्यांनी गद्दारी केली त्यांना सोडणार नाही. मोठ्या पक्षात गेले आहेत म्हणून त्यांनी भ्रमात राहू नये असा सूचक इशारा राजु पाटील यांनी यावेळी दिला. मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत असताना राजु पाटील यांनी ही फटकेबाजी केली. या कार्यक्रमात ८०० जणांनी मनसेत प्रवेश केला.

    follow whatsapp