पुण्यात उद्धव ठाकरेंना धक्का, सलग तीनवेळा नगरसेवक असलेले नेते शिंदे गटात सामील

मुंबई तक

• 02:11 PM • 09 Jul 2022

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. शिवसेनेमध्येसध्या दोन गट पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट असे दोन गट सध्या आहेत. दरम्यान अनेक शिवसैनिक आता एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील व्हायला लागले आहेत. ठाणे, कल्याण- डोंबिवली मधील अनेक माजीनगरसेवकांनी शिंदे गटात […]

Mumbaitak
follow google news

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. शिवसेनेमध्येसध्या दोन गट पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट असे दोन गट सध्या आहेत. दरम्यान अनेक शिवसैनिक आता एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील व्हायला लागले आहेत. ठाणे, कल्याण- डोंबिवली मधील अनेक माजीनगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता पुण्यात देखील उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे.

हे वाचलं का?

पुण्यातील सलग तीनवेळा सेनेचे नगरसेवक राहिलेले प्रमोद भानगिरे (Pramod Bhangire) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सेनेला सोडचिठ्ठी देणारे आणि शिंदे यांना पाठिंबा देणारे भानगिरे हेपुण्याचे पहिले माजी नगरसेवक आहेत. पुणे महापालिकेत 2017 ते 2022 पर्यंत शिवसेनेचे 10 नगरसेवक होते.

प्रमोद भानगिरे यांना विश्वास आहे की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आणखी बरेच जण एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देतील.मुंबई तकशी बोलताना प्रमोद भानगिरे म्हणाले, “माझी भूमिका स्पष्ट आहे, मला शिवसेना फोडायची नाही, पण अनेकतळागाळातील शिवसैनिक आहेत ज्यांना एकनाथ शिंदेंच्या गटात जाण्याची इच्छा आहे”. आषाढी एकादशीसाठी पंढरपूरलाजाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सायंकाळी हडपसरला येणार असल्याची माहिती भानागिरे यांनी दिली.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत ४० आमदार घेऊन शिवसेनेविरोधात बंड केले. काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत युती नको असेसांगत ते बाहेर पडले. १२ दिवस राज्याबाहेर राहिल्यानंतर शिंदे आपल्या आमदारांसह राज्यात आले, मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिंदेंच्या गटात अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी आमदार सामील व्हायला लागले. आज एकनाथ शिंदे दिल्लीमध्येआहेत, आणि लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल असे त्यांनी सांगितलं आहे.

    follow whatsapp