आता रात्रीही करता येणार स्कुबा डायव्हिंग; ‘तारकर्ली’त ‘आरमार’ बोट दाखल

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या एमटीडीसी अंतर्गत मालवण तारकर्ली येथे समुद्री तळाचे अंतरंग न्याहाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुद्दुचेरीवरून आणण्यात आलेल्या भारतातील पहिल्या आरमार नावाच्या बोटीचे उद्घाटन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. तारकर्ली, देवबाग, मालवण येथील पर्यटन व्यावसायिकांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन विविध मागण्यांची निवेदनेही दिली. एमटीडीसीच्या इमारतीवरून समुद्र किनारपट्टी व एमटीडीसी परिसराची पाहणी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:45 PM • 21 Feb 2022

follow google news

हे वाचलं का?

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या एमटीडीसी अंतर्गत मालवण तारकर्ली येथे समुद्री तळाचे अंतरंग न्याहाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुद्दुचेरीवरून आणण्यात आलेल्या भारतातील पहिल्या आरमार नावाच्या बोटीचे उद्घाटन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.

तारकर्ली, देवबाग, मालवण येथील पर्यटन व्यावसायिकांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन विविध मागण्यांची निवेदनेही दिली.

एमटीडीसीच्या इमारतीवरून समुद्र किनारपट्टी व एमटीडीसी परिसराची पाहणी आदित्य ठाकरेंनी केली.

या बोटीत चेंजिंग रूम, अत्याधुनिक स्वच्छतागृह, अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत. त्यामुळे बोटीच्या माध्यमातून रात्री सुद्धा स्कुबा डायव्हिंग करता येणार आहे.

जिल्ह्यात पर्यटनाचे आणखी एक दालन खुले झाले आहे. तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरला आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन उपलब्ध अत्याधुनिक उपकरणे व सामग्रीची, तसेच स्कुबा डायव्हिंग टॅंकची पाहणी केली.

तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या ताफ्यात ही अत्याधुनिक बोट दाखल झाली असून, यावेळी आदित्य ठाकरेंनी स्टेअरिंग हाती घेत बोट चालवण्याच्या आनंद घेतला.

दौऱ्यादरम्यान वायरी येथील जि.प. शाळेला आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

    follow whatsapp