Navi Mumbai Crime : नवी मुंबईत शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिला शिक्षिकेनं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप केला. व्हिडिओ कॉल करुन महिला शिक्षिका विद्यार्थ्यांना उत्तेजित करण्याचा प्रयत्न करायची. या प्रकरणी कौपरखैरणे पोलिसांनी शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला. सोमवार 27 जुलै रोजी शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'हप्ता भर अन् बायकोला जा घेऊन...' कर्ज न फेडल्याने बँकेनं महिलेला सोडलंच नाही, पती विनंती करून दमला अखेर...
नेमकं काय घडलं?
प्रसारमाध्यमांनुसार, नवी मुंबईतील कोपरखैरणेच्या एका खासगी शाळेतील महिला शिक्षिकेनं आपल्याच विद्यार्थ्याला इंस्टाग्रामवरून व्हिडिओ कॉल केला. महिला शिक्षिकेनं जेव्हा विद्यार्थ्याला व्हिडिओ कॉल केला होता, तेव्हा शिक्षिका अर्धनग्न अवस्थेत होती, असा शाळेतील विद्यार्थ्याने आरोप केला. या घटनेनं कोपरखैरणे हे शहर पुरतं हादरून गेलं आहे. दरम्यान, शिक्षिका ही नवी मुंबईतील उलवे परिसरातील रहिवासी आहे.
शिक्षिकेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार
शिक्षिकेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ते पाहूणच विद्यार्थ्याच्या कुटुंबाने शिक्षिकेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. आरोपी आणि पीडितेचे फोन तपासल्यानंतर अश्लील व्हिडिओ आढळले. पोलिसांनी सांगितलं की, शाळेतील आणखी दोन पीडित विद्यार्थी आहेत, परंतु अद्यापही या संदर्भात कसलीही तक्रार दाखल केली नाही.
हे ही वाचा : दोघेही एकमेकांवर जिवापाड प्रेम करायचे, प्रेयसीबाबत प्रियकराला भलतंच कळालं, नंतर प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल
दरम्यान, अशीच एक घटना मुंबईत घडली होती. अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली शिक्षिकेला अटक केली होती. त्यानंतर आरोपी महिलेला न्यायालयाने जामीन मंजूर केला. एका वृत्तमाध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, पोक्सो कायद्यान्वये महिलेवर गुन्हा दाखल केला होता. शिक्षिका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये विद्यार्थ्याला घेऊन जायची आणि विद्यार्थ्यासोबत शरीरसंबंध ठेवयाची. न्यायालयात शिक्षिकेनं दोघांच्या परस्परसंमतीने संबंध झाल्याचे सांगितले, असा महिलेनं दावा केला होता.
ADVERTISEMENT
