Mumbai News: मुंबईत भारतातील सर्वात मोठं सेंट्रल पार्क बांधण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. सोमवारी (15 डिसेंबर) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी आणि आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्यासमवेत या ही योजना जाहीर केली. याबाबत माहित देताना शिंदे म्हणाले की, महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडवरील रिकाम्या जागेला एकत्रित करून 295 एकर क्षेत्रफळ असलेला जागतिक दर्जाचा सेंट्रल पार्क विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेंट्रल पार्कच्या बांधकामासाठी 700 ते 750 कोटी रुपये खर्च होणार असल्याची अपेक्षा आहे. हा सेंट्रल पार्क थेट कोस्टल रोडशी एका भूमिगत (अंडरग्राउंड) मार्गाने जोडला जाणार असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
295 एकर जमिनीवर सेंट्रल पार्क
याशिवाय, एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, रेसकोर्स आणि त्याच्या ऐतिहासिक वारशाचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही. महालक्ष्मी रेसकोर्सवरील 125 एकर जमिनीवर जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क विकसित केलं जाणार आहे. तसेच, यामध्ये कोस्टल रोडवरील 170 एकर जमिनीचा समावेश केला जात असून एकूण 295 एकर जमिनीवर पार्क बांधलं जाणार आहे. सेंट्रल पार्कच्या खाली 10 लाख चौरस फूट असलेले जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) बांधलं जाणार आहे.
हे ही वाचा: Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय सरकारी संस्थेत सहभागी व्हा! DRDO कडून फ्रेशर्स तरुणांसाठी भरती...
ठाण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं अम्युझमेंट पार्क
उपमुख्यमंत्र्यांनी या योजनेबाबत माहिती दिली की, भारतातील सर्वात उंच व्ह्यूइंग टॉवर ठाणे खाडीच्या काठी 50 एकर जागेवर बांधला जाणार आहे. हा टॉवर 260 मीटर उंच असणार आहे. कासारवडवली येथे कन्व्हेन्शन सेंटर, कोलशेतमध्ये 25 एकर जमिनीवर टाउन पार्क, कृषी-कोळी संग्रहालय, मत्स्यालय, विज्ञान केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्नो पार्क, अम्युझमेंट पार्क, अॅडव्हेन्चर पार्क, 12.5 एकर जमिनीवर पक्षी (बर्ड) पार्क, 25 एकर जमिनीवर म्युझिकल कॉन्सर्ट सेंटर आणि 50 एकरवर अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधलं जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
हे ही वाचा: 'असे' विकत होता पॉर्न Video, थेट घराच्या पत्त्यावर आलं तरी कोण?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेद्वारे बऱ्याच घोषणा केल्या आहेत. त्यांनी विधानसभेत घोषणा केली की पुढील दोन वर्षांत मुंबईच्या अतिरिक्त 132 किमी मार्गावर मेट्रो सेवा सुरू केली जाईल. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, राज्यात मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधा वेगाने विकसित केल्या जात आहेत. सध्या मुंबईत 91 किमी मेट्रो मार्गावर दररोज 9,50,000 प्रवासी प्रवास करतात. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, ऑरेंज गेट मरीन ड्राइव्ह बोगदा प्रकल्प, कोस्टल रोड, वांद्रे-वर्सोवा सी लिंक, वर्सोवा-दहिसर आणि दहिसर-भाईंदर कोस्टल रोड तसेच उत्तन-विरार सी लिंक प्रोजेक्ट्सना मंजुरी देण्यात आली आहे. मेट्रो 4, मेट्रो 5, मेट्रो 6, मेट्रो 9 आणि मेट्रो 2B प्रोजेक्ट्सचं बांधकाम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











