रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ६ तासांनी पूर्ववत

गेल्या ६ तासांपासून ठप्प असलेली मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आता हळुहळु सुरु झाली आहे. परशुराम घाटातील रस्त्यात आलेला मातीचा ढीग आणि दरड बाजूला हटवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. पोकलेनने ही दरड आणि माती दूर करण्यात आली असून घाटातून वाहतूक हळुहळु पुढे सोडण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सध्या सुरू आहे. परशुराम घाटात गेल्या काही […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:59 AM • 08 Feb 2022

follow google news

गेल्या ६ तासांपासून ठप्प असलेली मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आता हळुहळु सुरु झाली आहे. परशुराम घाटातील रस्त्यात आलेला मातीचा ढीग आणि दरड बाजूला हटवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. पोकलेनने ही दरड आणि माती दूर करण्यात आली असून घाटातून वाहतूक हळुहळु पुढे सोडण्यात येत आहे.

हे वाचलं का?

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सध्या सुरू आहे. परशुराम घाटात गेल्या काही दिवसांपासून रस्त्याचं काम सुरू आहे. आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास दरड फोडण्याचं काम सुरू असताना अचानक दरड कोसळली, यामध्ये २ जेसीबी दरडीखाली गेले. या दुर्घटनेत एका जेसीबी चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. या दुर्घटनेनंतर महामार्गावरची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.

काही दिवसांपूर्वी परशुराम घाटातच काम सुरू असताना एक भला मोठा दगड पेढे गावातील बौद्धवाडीत राहणाऱ्या रोहिणी रमेश गमरे यांच्या घरावर पडला होता ज्यामुळे घराला भगदाड पडलं होतं. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. त्यात आज पुन्हा एकदा ही दुर्घटना घडल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. उद्या अशीच दुर्घटना घडली तर घाटाखाली असलेले पेढे गाव उध्वस्त होऊ शकतं, अशी भीती नागरिकांनी आहे. तसेच हे काम योग्य पद्धतीने होत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. परंतू सहा तासांच्या प्रयत्नानंतर रस्त्यावर आलेली दरड हटवण्यात प्रशासनाला यश आलं आहे.

गेटवे ऑफ इंडियाजवळील घटना : मांडवाकडे निघालेल्या बोटीतील प्रवासी पडला समुद्रात

    follow whatsapp