उदय सामंतांचे भाऊ विनायक राऊतांना आव्हान देणार? शिंदे गटातील बड्या नेत्यानं स्पष्ट सांगितलं

मुंबई तक

• 04:15 PM • 08 Nov 2022

सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आगामी उमेदवार म्हणून मागील काही दिवसांपासून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांच्या नावाची चर्चा होतं आहे. यावर आज शिंदे गटातील बडे नेते आणि माजी खासदार सुधीर सावंत यांनी स्पष्टपणे भाष्य केलं. कणकवली येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुधीर सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जागा […]

Mumbaitak
follow google news

सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आगामी उमेदवार म्हणून मागील काही दिवसांपासून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांच्या नावाची चर्चा होतं आहे. यावर आज शिंदे गटातील बडे नेते आणि माजी खासदार सुधीर सावंत यांनी स्पष्टपणे भाष्य केलं. कणकवली येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हे वाचलं का?

सुधीर सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जागा सध्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे भविष्यात ही जागा शिंदे-भाजप युतीत निश्चितच शिंदे गटाकडे येईल. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, ही जागा आमच्याकडे आल्यानंतर त्या जागेवर आम्ही सहज विजय मिळवू. त्यातही जर किरण सामंत ही जागा लढवण्यासाठी इच्छुक असतील तर आम्हाला आनंदच आहे. कारण ह्या जागेसाठी ते पात्र व योग्य उमेदवार आहेत, असेही सावंत यांनी सांगितलं.

त्यामुळे आगामी काळात बाळासाहेबांची शिवसेना विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असा सामना इथे पाहायला मिळू शकतो, असं बोललं जातं आहे. अशातच जर ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिल्यास आणि शिंदे गटाकडून किरण सामंत यांचं नाव अंतिम झाल्यास उदय सामंतांचे भाऊ विनायक राऊतांना आव्हान देताना दिसून येतील.

कोण आहेत किरण सामंत?

किरण सामंत हे इंजिनिअर आहेत. बांधकाम हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय सध्या ते संभाळत आहेत. त्याचबरोबर पडद्यामागून राजकारणाची सूत्र हलविणारा नेता म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. उदय सामंत यांच्या मतदारसंघातील त्यांची काम किरण सामंत हेच बघतात, असं सांगितलं जातं. सोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणातही त्यांचा चांगला संवाद असल्याच दिसून येत. शिंदे गटातील अनेक पक्षप्रवेश हे त्यांच्याच उपस्थित पार पडतात. याशिवाय अलिकडेच मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुरत्न समुद्धी योजनेच्या सदस्यपदीही किरण सामंत यांची नियुक्ती केली आहे.

    follow whatsapp