वाघिणीच्या हल्ल्यात मृत पावलेल्या वनरक्षक ढोमणेंच्या कुटुंबासाठी धावलं ठाकरे सरकार, १५ लाखांची मदत जाहीर

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढोमणेंच्या परिवारासाठी राज्य सरकार धावून आलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ढोमणे यांच्या परिवाराचं सांत्वन केलं असून कुटुंबाला १५ लाखांची सरकारी मदत आणि पतीला सरकारी नोकरी देण्याचं जाहीर केलं आहे. ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक श्रीमती ढोमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ओढून नेल्याने […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:01 AM • 21 Nov 2021

follow google news

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढोमणेंच्या परिवारासाठी राज्य सरकार धावून आलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ढोमणे यांच्या परिवाराचं सांत्वन केलं असून कुटुंबाला १५ लाखांची सरकारी मदत आणि पतीला सरकारी नोकरी देण्याचं जाहीर केलं आहे.

हे वाचलं का?

ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक श्रीमती ढोमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ओढून नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. गणनेच्या कर्तव्यावर असतानाच माया नावाच्या वाघिणीने हल्ला केला. शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

शनिवारी (20 नोव्हेंबर) सकाळी आठ वाजेच्या सुमारास कोर झोनमधील कोलारा गेट येथील वॉटर होल क्रमांक 97 जवळ ही घटना घडली. या घटनेने ताडोबा व्याघ्र अभयारण्यात एकच खळबळ उडाली आहे. तीन वन मजूर आणि एक महिला वनरक्षक यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिककरणाकडून करण्यात येणाऱ्या व्याघ्र गणना सुरू केली होती. सकाळी 7 वाजता कोलरा गेटपासून आत 4 किमी गेल्यानंतर वॉटर होल 97 जवळ त्यांना वाघ असल्याचं दिसलं. त्यांच्यापासून जवळपास 200 किमी अंतरावर वाघीण रस्त्यावर बसलेली होती.

त्यामुळे ते वाघीण जाण्याची वाट बघत बसले. एक ते दीड तास त्यांनी वाघीण निघून जाण्याची प्रतिक्षा केली. मात्र, वाघीण तिथेच बसून होती. त्यामुळे त्यांनी जंगलातून दुसऱ्या वाटेनं जाण्याचा प्रयत्न केला. जंगलात हालचाल झाल्याचं वाघिणीला दिसलं. त्यानंतर वाघिणीने पाठलाग करत हल्ला केला. स्वामी ढोमणे यांच्यावर हल्ला केल्या तेव्हा वन मजूर पाठीमागे होते. माया नावाच्या वाघिणीने हल्ला केल्यानंतर स्वाती ढोमणे यांना फरफटत जंगलात नेलं. शोध घेतल्यानंतर जवळच त्यांचा मृतदेह सापडला. त्यांचा मृतदेह चिमूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.

व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अभयारण्यात सध्या 250 पेक्षा जास्त वाघ आहेत. यापैकी कोर आणि बफर भागात 100 वाघ आहेत, तर बाहेर प्रादेशिक जंगलात 150 पेक्षा जास्त वाघ आहेत.

    follow whatsapp