उद्धव ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारींना दिली ऑफर; उपस्थितांनाही हसू झालं अनावर

बऱ्याच महिन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले. त्यामुळे या कार्यक्रमाकडे आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. मुख्यमंत्र्यांनी नेहमीच्या शैलीत भाषण करत थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ऑफर दिली. त्यांची ही ऑफर ऐकून उपस्थितांनाही हसू आवरता आलं नाही. राजभवनातील हिरवळीखाली सापडलेल्या ब्रिटिशकालीन बकंरमध्ये क्रांती गाथा दालन तयार करण्यात आलं आहे. या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:27 PM • 14 Jun 2022

follow google news

बऱ्याच महिन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले. त्यामुळे या कार्यक्रमाकडे आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. मुख्यमंत्र्यांनी नेहमीच्या शैलीत भाषण करत थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ऑफर दिली. त्यांची ही ऑफर ऐकून उपस्थितांनाही हसू आवरता आलं नाही.

हे वाचलं का?

राजभवनातील हिरवळीखाली सापडलेल्या ब्रिटिशकालीन बकंरमध्ये क्रांती गाथा दालन तयार करण्यात आलं आहे. या दालनाचं आणि राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या जल भूषण या इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं.

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांच्या नव्या निवासस्थानाचा स्तुती करण्याचा मोह आवरला नाही. ‘या वास्तूचं जसं नुतनीकरण झालं, तसं जल भूषण जिकडे आपले राज्यपालांचं निवासस्थान आहे,’ असं बोलत असताना मुख्यमंत्री ठाकरे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे बघत म्हणाले, ‘तुम्ही, खूप चांगली इमारत बनवलीये. अदलाबदली करायची का?,’ असं मुख्यमंत्र्यांनी विचारताच उपस्थितांमधून हास्याचे तुषार उडाले.

या भाषणात उद्धव ठाकरे आणखी काय म्हणाले?

“स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करताना क्रांती गाथा दालनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होतंय हा खूप चांगला मुहूर्त आहे. आपण नेहमी काही गोष्टी ऐकत आलो. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझी जुळती, त्यामुळे बोलायचं काय?.”

“जे स्वातंत्र्य आपण उपभोगतोय ते मिळवण्यासाठी किती जणांनी आपल्या घरादारावर निखारे ठेवले. किती जणांनी त्यासाठी बलिदान केलं. किती जणांनी मरणप्राय यातना सोसल्या. एक क्षणभर विचार असा येतो की, हे सगळं घडलं नसतं, तर आपण इथे येऊ शकलो असतो का? स्वातंत्र्य मिळालंय, पण ते स्वातंत्र्य आपल्याला कुणी आणंद दिलं नाही. स्वातंत्र्य आपल्याला लढवून मिळवावं लागलं. तो इतिहास फक्त जतन नाही, तर जिवंत करणं हे आपलं काम आहे.”

“काळ पुढे चाललेला आहे. आपण १५० वर्षे पारतंत्र्यात होतो. त्यानंतर स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाली. आता पुढे पुढे जाणार आहोत. पुढे जात असताना काही गोष्टी पुढच्या पिढीला द्यायच्या आहेत. ते काम आपण केलं नाही, तर मला असं वाटतं की आपण आपल्या कर्तव्याला मुकू.”

“२०१६ साली आपल्याला हे भूयार/खदंक सापडलं. त्यावेळचे महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव होते. ते मला बोलवतं होते, पण येणं झालं नाही. त्यावेळी मनात विचार यायचा की, जाऊन बघून करायचं काय? आज त्याचा अप्रतिमपणे उपयोग होतोय.”

“फिल्म बघत असताना त्यातील एक शब्द मला आवडला, तीर्थक्षेत्र. ज्या क्रांतिकारकांनी आपल्यासाठी त्याग केला, त्यांचं संकलन व्हायला पाहिजे. फक्त बोलत बसण्यापेक्षा या क्रांतिकारकांनी आपल्यासाठी ज्या काही गोष्टी केल्या आहेत, त्यातील एखादी गोष्ट करु शकलो, तर ते कृतार्थ होतील.”

    follow whatsapp