महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही. बेबंदशाही चालली आहे. जे सत्तेत आहेत तेच धिंगाणा घालत आहत. पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येऊन सूड घेत आहेत. राज्यात खून होत आहेत, दरोडे पडत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्र्यांचा कोणावरही अंकुश राहिलेला नाही. नवनीत राणा या खासदार आहेत तर रवी राणा हे आमदार आहेत. मुख्यमंत्री सक्षम आहेत का? त्यांना राज्याचे प्रश्न माहित नाहीत. त्यांचं शेवटचं भाषण अंतिम आठवडा प्रस्तावावार झालं. पण हे भाषण कलानगरच्या नाक्यावरच्या भाषणासारखं होतं. त्यांनी महाराष्ट्राला दहा वर्ष मागे नेले आहे. 89 हजार कोटी तूट असून राज्याची व्यवस्था पूर्ण बिघडली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवले नाहित तर मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण करू असे म्हटले होते. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानाबाहेर येऊन हनुमान चालिसाचे पठण करणार असे आव्हान दिले होते. त्यानुसार राणा दाम्पत्य शुक्रवारी मुंबईत आले.
नवनीत राणा या खासदार आहेत, त्यांचे पती आमदार आहेत. त्यांना जी वागणूक दिली जाते आहे ती योग्य नाही. सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली. त्यावेळी तिथे एक मंत्री उपस्थित होता. तसंच दिशा सालियनवर अत्याचार केले आणि हत्या केली त्यावेळीही मंत्री होता. ही परिस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे. मुख्यमंत्री सक्षम नाहीत का? परिस्थिती हाताळण्यात? असं विचारण्यात आल्यानंतर नारायण राणे म्हणाले की ते कधी सक्षम होते? प्रशासन, राज्याचे प्रश्न काहीही त्यांना माहित नाही. कॅबिनेटला बसत नाहीत. सभा घेत नाहीत. त्यांना कारभार कसा चालतो माहित नाही असाही आरोप नारायण राणेंनी केला.
मात्र शिवसैनिकांनी यावेळी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर राणा दाम्पत्याने आपला निर्णय मागे घेतला. त्यानंतर या दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. खार पोलिसांनी शुक्रवारी त्यांना अटक केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेले होते. परंतु, शिवसैनिकांनी यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यामुळे राज्यातील वातावरण सध्या चांगलच तापलं आहे. हाच मुद्दा उपस्थित करून नारायण राणे यांनी राष्ट्रपती राजवट लागू व्हावी अशी मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
