ज्येष्ठ अभिनेत्री तब्बसुम काळाच्या पडद्याआड; वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई तक

• 05:13 PM • 19 Nov 2022

मुंबई : दूरदर्शनवरील ‘फूल खिले है गुलशन गुलशन’ प्रसिद्ध सेलिब्रिटी टॉक शोमुळे लोकप्रिय झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचं आज निधन झालं. त्या ७८ वर्षांच्या होत्या. काल (शुक्रवारी) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यातच त्यांचं मृत्यू झाला, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. तबस्सुम यांनी अलीकडंच एका शोसाठी शूटिंगची सुरुवात केली होती. […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : दूरदर्शनवरील ‘फूल खिले है गुलशन गुलशन’ प्रसिद्ध सेलिब्रिटी टॉक शोमुळे लोकप्रिय झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचं आज निधन झालं. त्या ७८ वर्षांच्या होत्या. काल (शुक्रवारी) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यातच त्यांचं मृत्यू झाला, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

हे वाचलं का?

तबस्सुम यांनी अलीकडंच एका शोसाठी शूटिंगची सुरुवात केली होती. उर्वरीत शूटिंग पुढील आठवड्यात पार पडणार होणार होतं. तसंच त्यांच्या प्रकृतीही अगदी उत्तम होती. गेल्या वर्षी कोविडवरील आणि अलिकडेच गॅस्ट्रोवरील उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु या दोन्हीमधून त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या होत्या, अशीही माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

१९४७ मध्ये बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात :

तबस्सुम यांनी १९४७ मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात झाली होती. ‘नर्गिस’ या सिनेमातून बालकलाकार म्हणून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांना बेबी तबस्सुम म्हणून ओळखलं जायचं.

त्यानंतरच्या काळात तब्बसुम यांनी मेरा सुहाग (१९४७), मंझधार (१९४७), बरी बहन (१९४९), दीदार (१९५१) अशा अनेक चित्रपटांतून लोकप्रिय भूमिका केल्या. या दरम्यान, १९७२ ते १९९३ या काळात प्रसिद्ध सेलिब्रिटी टॉक शो ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’चं सूत्रसंचालनही त्यांनी केलं. १९९० साली आलेला स्वर्ग हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची श्रद्धांजली :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अभिनेत्री तब्बसुम यांना श्रद्धांजली वाहिली. हिंदी चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री व निवेदिका तबस्सुम यांचे निधन झाल्याची बातमी अतीव दुःखदायक आहे. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री आणि निवेदिका काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना. अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

    follow whatsapp