राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आता दोन वर्षांचा कार्यकाळ उलटला आहे. परंतू अजुनही शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा राज्यात सुरु आहेत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आज पुण्यात एका कार्यक्रमात बोलत असतानाही शिवसेना-भाजप यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. इतकच नव्हे तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अडीच वर्षांच्या वाटाघाटीवर चूक झाल्याचं फडणवीसांनी आपल्याकडे मान्य केल्याचंही विक्रम गोखले म्हणाले.
ADVERTISEMENT
“ज्या बाळासाहेबांची भाषणं ऐकून महाराष्ट्र केली ४० वर्ष तृप्त झाला आहे त्याच बाळासाहेबांच्या निधनानंतर राजकारणामधले खेळ सुरु आहेत ते विचीत्र स्तरावर पोहचले आहे. मराठी माणूस यात भरडला जातोय, लोकं अस्वस्थ आहेत. प्रसारमाध्यमांना याची फारशी कल्पना नसेल. आमच्यासारखी माणसं बाहेर फिरतात तेव्हा सर्व क्षेत्रातील लोकांशी आमचा संबंध येतो तेव्हा प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की हे गणित चुकलेलं आहे.”
परंतू हे गणित सुधारण्याची वेळ अजुनही गेलेली नाही असं विक्रम गोखलेंनी स्पष्ट केलं. ज्या संकटाच्या कड्यावर सध्या आपला देश उभा आहे तिकडून त्याला मागे खेचायचं असेल तर शिवसेना आणि भाजपने एकत्र आलंच पाहिजे अशी माझी श्रद्धा आहे. त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. फडणवीसांना मी प्रत्यक्ष प्रश्न विचारला होता की अडीच वर्ष त्यांना सत्ता दिली असती तर काय बिघडलं असतं. ज्याला उत्तर देताना त्यांनी झाली चूक असं मान्य केल्याचं विक्रम गोखलेंनी स्पष्ट केलं.
कंगना जे बोलली ते खरंय, तिच्या मताशी मी सहमत -अभिनेते विक्रम गोखले
शिवसेना आणि भाजपमध्ये जे काही झालं असेल, त्यांनी लोकांना विश्वासात घ्यायला हवं होतं. लोकांना फसवू नका, लोकं संतापली की कधीतरी खूप शिक्षा करतात. तेच आता आपण भोगतोय. मी यासाठी उद्धवजींशी स्वतः जाऊन भेटेन, देश वाचवायचा असेल तर आपल्याला काही करावं लागेल. हा मिळालेल्या जनाधाराचा अपमान आहे. महाराष्ट्रातल्या जनतेसाठी त्यांनी एकत्र यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा असल्याचं गोखलेंनी यावेळी सांगितलं. त्यामुळे त्यांच्या या विधानावर आता काय प्रतिक्रीया उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
