नीलम गोऱ्हे, राहुल नार्वेकर आमने-सामने; भर सभागृहात संताप

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आमने-सामने आले आहेत. राहुल नार्वेकर यांचा एककल्ली कारभार चालू आहे, विधीमंडळ परिसरातील कार्यक्रमांबाबत आपल्याला माहिती दिली जात नाही, ते आपल्याला विश्वासात घेत नाहीत, असा दावा गोऱ्हे यांनी केला आहे. भर सभागृहात गोऱ्हे यांनी नार्वेकरांनी केलेल्या अन्यायाचा पाढा वाचला, त्यामुळे आश्चर्य […]

Mumbai Tak

मुंबई तक

16 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 04:23 PM)

follow google news

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आमने-सामने आले आहेत. राहुल नार्वेकर यांचा एककल्ली कारभार चालू आहे, विधीमंडळ परिसरातील कार्यक्रमांबाबत आपल्याला माहिती दिली जात नाही, ते आपल्याला विश्वासात घेत नाहीत, असा दावा गोऱ्हे यांनी केला आहे. भर सभागृहात गोऱ्हे यांनी नार्वेकरांनी केलेल्या अन्यायाचा पाढा वाचला, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होतं आहे. (Vidhan Parishad Deputy Speaker Neelam Gorhe got angry with Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar)

हे वाचलं का?

काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रसिद्ध गीतकार मुकेश यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त ‘शतायू मुकेश’ या कार्यक्रमाचं विधीमंडळाच्या हिरवळीवर आयोजन केले होते. तसेच सर्व आमदारांसाठी स्नेहभोजन ठेवण्यात आले होते. यावरुनच गोऱ्हे यांनी राहुल नार्वेकरांवर नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, मला थेट पत्र मिळालं की असा कार्यक्रम आहे. नागपूरमध्ये आपण करतो. पण, मुंबईत असा संगीताचा कार्यक्रम कधी झाला नाही. अध्यक्षांना वाटलं असेल, मी विरोध केला नाही. पण, माझं मत विचारलं गेलं नाही.

हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रच्या अनावरणावेळीही शेवटपर्यंत अध्यक्षांनी कोणतीच माहिती दिली नाही. माझी अधिकाऱ्यांवर नाराजी नाही. पण, कुठलं तैलचित्र लागणार हे केवळ अध्यक्ष यांनाच माहित होतं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या कस्टडीत ठेवणं इतक्या पॉवर अध्यक्ष यांच्याकडे आहेत का, असा सवालच गोऱ्हेंनी विचारला.

“संजय राऊतांना अटक करा”; नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “त्याची सर्वांनी तयारी ठेवा”

काय घडत मला निदान कळालं पाहिजे इतकी इच्छा आहे, असं मत व्यक्त करतं गोऱ्हे म्हणाल्या, मला कळलं की अजिंठा बंगला येथे आता 6 व्यक्तींसाठी मोठे क्वार्टरस् बांधले जाणार आहेत. इथे विरोधी पक्ष, सभापती, उपसभापती यांना जागा असणार आहेत. मी विचारलं की बैठक झाली का? तेव्हा गरजेची नाही, अध्यक्षांनी निर्णय घेतला, असं सांगण्यात आलं, अशीही नाराजी त्यांनी बोलून दाखविली.

    follow whatsapp