RSS च्या सर्वेक्षणात काय दडलंय? रुपाणींना का द्यावा लागला राजीनामा?

मुंबई तक

• 09:26 AM • 12 Sep 2021

गुजरात मुख्यमंत्री पदाचा विजय रुपाणी यांनी शनिवारी राजीनामा दिला. विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर अनेक प्रश्नांनी डोकं वर काढलं असून, त्याची राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आपापल्या परीने शोधाताना दिसत आहे. भाजपने मुख्यमंत्री बदलाचा निर्णय घेतल्यानंतर प्रामुख्यानं दोन-तीन कारण समोर येत आहे. या दोन-तीन कारणांमधील एक बाब आहे म्हणजे RSS ने केलेलं गोपनीय सर्वेक्षण. पुढील वर्षी म्हणजे […]

Mumbai Tak
Google CTA

हे वाचलं का?

गुजरात मुख्यमंत्री पदाचा विजय रुपाणी यांनी शनिवारी राजीनामा दिला.

विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर अनेक प्रश्नांनी डोकं वर काढलं असून, त्याची राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आपापल्या परीने शोधाताना दिसत आहे.

भाजपने मुख्यमंत्री बदलाचा निर्णय घेतल्यानंतर प्रामुख्यानं दोन-तीन कारण समोर येत आहे.

या दोन-तीन कारणांमधील एक बाब आहे म्हणजे RSS ने केलेलं गोपनीय सर्वेक्षण.

पुढील वर्षी म्हणजे २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणी करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आल्याचं सांगितलं जातं.

ऑगस्ट महिन्यात हे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती आली असून, सूत्रांच्या माहितीनुसार या सर्वेक्षणामुळेच भाजपने चेहरा बदलण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.

भाजपने २०२२ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक विजय रुपाणी यांच्या चेहऱ्यावर लढवली, तर पराभव होऊ शकतो, असं या सर्वेक्षणात दिसून आल्याचं सांगितलं जात आहे.

या सर्वेक्षणाबद्दल काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनीही भाष्य केलेलं आहे. या सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीमुळेच विजय रुपाणींचा राजीनामा घेतल्याचा दावा पटेल यांनी केला आहे.

पटेल यांनी या सर्वेक्षणातील पक्षनिहाय जागा आणि मतांच्या टक्केवारीचीही माहिती ट्वीट करून सांगितली आहे.

पटेल यांनी ट्वीटमध्ये केलेल्या दाव्याप्रमाणे या सर्वेक्षणामुळे भाजपला धक्का बसला आहे. ‘काँग्रेसला ९६ ते १०० जागा (मते ४३ टक्के), भाजप ८० ते ८४ जागा (मते ३८ टक्के), आप ० जागा (मते ३ टक्के), एमआयएम ० जागा (मते १ टक्के) अपक्ष ४ जागा (मते १५ टक्के) असं माहिती या सर्वेक्षणात असल्याचं पटेल यांनी म्हटलं आहे.