Eknath Shinde on Rahul Gandhi : "प्रधानमंत्री निवासाच्या परिसरामध्ये कुठलेही आंदोलन करता येत नाही. ही माहिती या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना असताना सुद्धा जाणीवपूर्वक तिथं आंदोलन केलं गेलं. हजारो लाखो लोकांना तिकडे बोलावणं याचा अर्थ काय? याचा अर्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानांमध्ये घातपात घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांचा हेतू होता. ते नेहमी बांगलादेश होणार म्हणतात. नेपाळ होणार म्हणतात. देशामध्ये अराजकता पसरवणं हा त्यांचा उद्देश होता", असा सनसनाटी आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
ADVERTISEMENT
"पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन करणे निंदनीय"
एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन करणे हे निंदनीय आहे. यापूर्वी देखील आपण दोन देशाचे प्रधानमंत्री गमावलेले आहेत. आणि म्हणून याचा मी अतिशय कठोर शब्दात निषेध करतो. कारण ते विरोधी पक्ष नेते असताना ते स्वतः सगळ्यांना आव्हान करत होते. इकडे आंदोलनाला या इकडे आंदोलनाला... या अरे आंदोलन तर जंतरमंतरवर होतं. मग तिकडे आंदोलन करण्यामागचा त्यांचा दृष्ट हेतू होता. ही फार गांभीर्याने घेण्याची बाब आहे.
हेही वाचा : नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, अहिल्यानगरातील घटना; सर्वत्र हळहळ
उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंची टीका
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, त्याचबरोबर काही लोक इकडून पण गेले. लोकांनी नाकारलं महाराष्ट्रातल्या लोकांनी ठोकारलं. ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन पेटवापेटवीची भाषा करत होते. आता आग लागलेली आहे. विजून देऊ नका. हे काय आहे? देशामध्ये अराजकता पसरवण्याचा तुमचा प्रयत्न आहे. तो यांचं आपल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्यामुळे मागे घेतल्यामुळे ते निराश झालेले आहेत. बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना अशा प्रकारचा हा विषय आहे. विद्यार्थ्यांच्या बरोबर आम्ही आहोत. विद्यार्थ्यांच्या बरोबर आमच्या संवेदना आहेत. विद्यार्थी हे देशाच भवितव्य आहे आणि विद्यार्थ्यांच्या पाठीमागे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पण आहेत. आता विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर अभ्यास करावा. आपलं करियर घडवावे. आपलं व्यासपीठ कुठल्याही राजकीय पक्षाला राजकारण करण्यासाठी देऊ नये, आवाहनही शिंदेंनी केलं.
खरं म्हणजे नीट पेपर लीक होणं ही देखील दुर्दैवी घटना घडली. त्या घटनेचं गांभीर्य या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ओळखलं. त्यांनी तात्काळ यामध्ये नवीन कायदा करण्याचा निर्णय घेतला. त्याच बिलही उद्या येईल. दहा वर्षाची सख्त मजुरीची शिक्षा, 10 कोटी रुपये दंड आणि केस फास्ट ट्रॅकवर चालणार आहे, असा कायदा होणार आहे. एनटीए मधून जवळपास 427 लोकांना काढून टाकण्यात आलं आहे, अशी माहितीही यावेळी शिंदेंनी दिली.
ADVERTISEMENT












