NCP MLA Jitendra Awhad posting a Dadaji Bhuse Viral Video: मुंबई: राज्यातील शिंदे सरकारमधील (Shinde Govt) एका पाठोपाठ एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. आता शिंदेच्या कॅबिनेटमधील आणखी एका मंत्र्याचा एक वादग्रस्त व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्री अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्यापाठोपाठ आता बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादा भुसे (Dadaji Bhuse) हे देखील वादात सापडले आहे. दादा भुसे यांचा एक शिव्या देताना आणि दोन तरुणांना मारहाण करत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. (viral video of minister dadaji bhuse abusing and beating youths was shared by ncp mla jitendra awhad)
ADVERTISEMENT
सध्या विधानसभेत विरोधकांनी शिंदे सरकारमधील शिंदे गटातील आमदारांना घेरण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे, त्यानंतर अब्दुल सत्तार आणि आता दादा भुसे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) एक व्हिडीओ ट्वीट करुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर असलेला जुना रागही बाहेर काढला आहे.
मंत्री Sanjay Rathod नव्या वादात, पुन्हा द्यावा लागणार राजीनामा?
पाहा जितेंद्र आव्हाडांनी नेमके काय ट्विट केले:
असे ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा तर साधला आहेच. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर जी कारवाई करण्यात आली होती. त्याबाबत देखील त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येत आहे की, मंत्री दादा भुसे हे दोन तरुणांना शिव्या देत असून त्यात त्यांनी एका तरुणाच्या कानाखाली मारली आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादीनं हा व्हिडिओ शेयर करत मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय हिवाळी अधिवेशनातही या विषयारून विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याची शक्यता आहे.
अब्दुल सत्तार गोत्यात; कोर्टाचे ताशेरे, अधिवेशनात गाजणार ‘जमीन घोटाळा’
परंतु हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तसेच दादा भुसेंनी या तरुणांना नेमकी का मारहाण केली, याची माहितीही अद्याप समोर आलेली नाही. मात्र गरमागरम अधिवेशनाच्या काळात असा व्हिडीओ समोर येणं म्हणजे शिंदे सरकारच्या अडचणीत नक्कीच वाढ होण्यासारखं आहे एवढं मात्र नक्की.
ADVERTISEMENT
