पेशवे पगडी परिधान करुन jyotiraditya scindia चं तुफान भाषण, पाहा काय म्हणाले मराठ्यांबाबत

मुंबई तक

• 07:35 AM • 21 Aug 2021

खरगौन (मध्य प्रदेश): जन आशिर्वाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) बुधवारी बाजीराव पेशवे (पहिला) यांच्या समाधीवर जाऊन त्यांना अभिवादन केलं. एवढंच नव्हे तर यावेळी त्यांनी तिथे उपस्थित जनसमुदायासमोर मराठा साम्राज्याच्या जाज्वल इतिहासबाबत तुफान भाषणही केलं. ‘या मातृभूमीच्या रक्षणासाठी 150 वर्षापर्यंत परदेशी सत्ताधीशांशी मराठे लढत राहिले. या देशात सर्वात पहिला भगवा झेंडा घेऊन […]

Mumbaitak
follow google news

खरगौन (मध्य प्रदेश): जन आशिर्वाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) बुधवारी बाजीराव पेशवे (पहिला) यांच्या समाधीवर जाऊन त्यांना अभिवादन केलं. एवढंच नव्हे तर यावेळी त्यांनी तिथे उपस्थित जनसमुदायासमोर मराठा साम्राज्याच्या जाज्वल इतिहासबाबत तुफान भाषणही केलं.

हे वाचलं का?

‘या मातृभूमीच्या रक्षणासाठी 150 वर्षापर्यंत परदेशी सत्ताधीशांशी मराठे लढत राहिले. या देशात सर्वात पहिला भगवा झेंडा घेऊन पुढे निघालेले छत्रपती शिवाजी महाराज हे देखील मराठा होते.’ असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांनी मराठ्यांच्या इतिहासाबाबत भाष्य केलं.

मध्यप्रदेशमधील भोपाळच्या खरगौन येथे बाजीराव पेशवे (पहिले) यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खास पगडी परिधान करुन ज्योतिरादित्य शिंदे यांनी जोरदार भाषण केलं. या कार्यक्रमाला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे देखील हजर होते.

आपल्या भाषणात शिंदे यांनी राजघराण्याचे पूर्वज, होळकर, मराठा साम्राज्याचे बाजीराव पेशवे आणि छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतच्या इतिहासातील अनेक घटना सांगितल्या. यावेळी शिंदे असं म्हणाले की, ‘बाजीराव पेशवे ही मराठ्यांची ओळख होती. हा एक योगायोग आहे की, ही समाधी माझ्या पूर्वजांनी बांधली होती. यामध्ये शिंदे कुटुंबाचे पूर्ण योगदान आहे.’

पाहा आपल्या भाषणात ज्योतिरादित्य शिंदेंनी मराठ्यांच्या इतिहासाविषयी नेमकं काय म्हटलं…

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी देशात सर्वप्रथम हिंदुत्व प्रस्थापित केले आहे. म्हणूनच आज आपली संस्कृती आणि इतिहास जिवंत आहे. रावेरखेडी येथे पेशव्यांचं स्मारक बांधण्याची योजना सरकारने आखली आहे. मराठ्यांचा वाडा इथे बांधला जावा आणि मराठ्यांची ओळख म्हणून त्यासाठी काळ्या दगडांचा वापर केला जावा.’

बाजीराव पेशव्यांनी कधीही युद्धात पराभव स्वीकारला नाही!

बाजीराव पेशव्यांनी कोणत्याही युद्धात पराभव स्वीकारला नाही. त्यांची शेवटची लढाई ही भोपाळच्या निजाम नसिरजंग बरोबर झाली होती. बाजीराव यांनी नासिरजंगचा पराभव करून ते रावेरखेडीला परतले होते. पण अचानक रावेरखेडी येथे त्यांची प्रकृती खालावली आणि वयाच्या 40व्या वर्षी त्यांनी नर्मदेच्या तीरावर अखेरचा श्वास घेतला.

पेशवा बाजीराव हे मराठा साम्राज्याचे पहिले महान सेनापती होते. ते 1720 ते 1740 पर्यंत मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहूजी महाराजांचे पेशवे (पंतप्रधान) होते. त्यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांना ‘बाजीराव बल्लाळ’ आणि ‘थोरले बाजीराव’ म्हणूनही ओळखले जाते.

लोक त्यांना अपराजित हिंदू सम्राट देखील मानतात. त्यांनी आपल्या कार्यक्षम नेतृत्वाच्या आणि डावपेचांच्या बळावर मराठा साम्राज्याचा (विशेषतः उत्तर भारतात) विस्तार केला. बाजीरावांच्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी मराठा साम्राज्य त्याच्या मुलाच्या कारकिर्दीत यशोशिखरावर पोहोचलं होतं. बाजीराव प्रथम हे सर्व नऊ पेशव्यांमध्ये सर्वोत्तम असल्याचे म्हटले जाते.

पत्रकार गिरीश कुबेर यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त मजकूर, वाचा नेमका काय आहे वाद?

18 ऑगस्ट रोजी बाजीराव पेशव्यांच्या जयंतीनिमित्त मध्यप्रदेशमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देखील बाजीराव पेशवे यांच्या समाधी स्थळी श्रद्धांजली अर्पण केली.

    follow whatsapp